सोशल मीडिया पाहतोस या कारणावरून तरुणावर हल्ला; कोपरगावच्या बेट परिसरात सकाळी दहशत

सोशल मीडिया पाहतोस या कारणावरून तरुणावर हल्ला; कोपरगावच्या बेट परिसरात सकाळी दहशत
सोशल मीडिया पाहतोस या कारणावरून तरुणावर हल्ला; कोपरगावच्या बेट परिसरात सकाळी दहशत
कोपरगाव विजय कापसे दि १५ डिसेंबर २०२५– कोपरगाव शहरात निवडणूक काळात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे (वय ३१, रा. वारी) यांच्यावर आज सकाळी हल्ला करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बाबासाहेब ठोंबरे हे आज सकाळी वारी येथून कोपरगावच्या दिशेने समता पतसंस्था येथे कामावर जात असताना बेट परिसरात काही अज्ञात दुचाकी वाहन चालकांनी त्यांना थांबवले. यावेळी “तूच सोशल मीडिया बघतोस का?” असे म्हणत त्यांच्यावर मारहाण करण्यात आली.

या घटनेची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयते यांनी दिली आहे. शहरात निवडणूक काळात विरोधकांकडून अशा प्रकारे दहशत माजवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “जर अशा प्रकारे दहशत निर्माण केली जात असेल तर आम्हालाही नको त्या पातळीवर जावे लागेल,” असे स्पष्ट मत त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे.




