आमदार थोरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे -ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे
आमदार थोरात यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे -ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे


या प्रसंगी आपल्या भाषणात प्रा.डॉ.कसबे म्हणाले की,संगमनेरचे राजकारणी हे सुसंस्कृत आहे.ते गुणग्राहक आहेत.त्यांना माणसांची जाण आहे.थोरात यांच्याकडे असलेल्या राजकीय शहाणपणाबद्दल त्यांनी कौतुक केले.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नाला सुराणा आपल्या भाषणात म्हणाले की, सरकार आणि शिक्षणाचे माध्यम हे लोकभाषा असायला हवी.त्यातून लोकाभिमुख व्यवस्था उभी राहण्यास मदत होत असते.प्रा.लामखडे यांनी समाजवादी चळवळ गतीमान करण्यासाठी योगदान दिले आहे.त्यांनी विचाराची माणसं घडविण्यासाठी केलेल्या कार्याबददलची कृतज्ञता म्हणजे आजचा गौरव समारंभ आहे असे मत व्यक्त केले.लामखडे यांचे साहित्य माणसाला प्रेरणा देणारी आहेत.आज त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली असून,लामखडे यांनी सतत चाकोरीबाहेर चालण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी जीवनभर एकाच विचाराच्या वाटेने प्रवास केला आहे.त्यांनी निसर्गासोबत जगण्याचा प्रयत्न केला.त्यातून त्यांच्या आयुष्यात गाव,निसर्ग आणि पर्यावरण सुटले नाही असेही पन्नालाल सुराणा यांनी मत व्यक्त केले.डॉ.डोळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की,वर्तमान स्थिती अधिक उत्तोमत्तोम विचारांची पेरणी करण्याची गरज आहे.राज्यघटनेच्या तत्वांसाठी लामखडे यांनी आय़ुष्य वेचले आहे.अध्यक्षीय भाषणात आ.थोरात म्हणाले की, गौरव समितीने अत्यंत सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.हा सत्कार सोहळा म्हणजे लामखडे यांच्या विचाराच्या वाटेचा सत्कार आहे.संगमनेरने महाराष्ट्राला अनेक विचारवंत,लेखक दिले.लामखडे सर यांनी विचाराशी निष्ठा कायम ठेवली.पुरोगामी विचाराच्या वाटेने इतर विद्यार्थी यावेत यासाठी त्यांनी सतत विचाराची पेरणी केली.चांगला विचार पेरण्याची गरज आहे.विचाराची पेरणी गेले तर तो जीवनभर पुरतो पण आज ते विचार पेरण्याचे काम होताना दिसत नाही याबद्दल खंत व्यक्त केली.आम्ही राज्यघटनेचे तत्वज्ञान मानतो,त्याला जीवनप्रणालीचा विचार मानतो. राज्यघटनेचा विचार स्वीकारणारा प्रत्येक माणूस समाजवादी समजायला हवा.संत ज्ञानेश्वरांचे पसायदानात संत विचाराचा अर्क आहे.संताच्या सर्व विचाराचे सार सामावलेले प्रा.पठारे म्हणाले की, लामखडे हे माणसात रमणार साहित्यिक आहेत. त्यांनी साहित्याच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले असले तरी अध्यापनातही त्यांचे विशेष होऊन राहिले आहेत अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे राहून त्यांनी साहित्य सेवा केली आहे.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवसमितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या मा.रा.लामखडे यांचा चाकोरी पलिकडचा या गौरवग्रंथाचे व सांस्कृतिक राजकारण,लोकवाटा या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी प्रा.लामखडे यांनी नळदूर्ग येथील राष्ट्र सेवादलाच्या माझे घर उपक्रमासाठी एक लाख रूपये,शिवांजली साहित्य चळवळीसाठी एक लाखरूपयाचा मदतीचा धनादेश देण्यात आला.त्याच बरोबर लामखडे व सौ.मंदाकिनी लाखमडे यांनी मरणोत्तर देहदानाचे प्रतिज्ञापत्र एस.एम.बी.टी वैदयकीय महाविद्यालयाला सादर केले. यावेळी रोहिणी गोरडे यांनी लामखडे यांच्या संदर्भाने विकसित केलेल्या लोकसंख्येत स्थळाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरवसमितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी केले. आभार सिताराम राऊत यांनी मानले .सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे उपाध्यक्ष हिरालाल पगडाल, सचिव संदीप वाकचौरे, प्रा. जयसिंह सहाणे, नामदेव गुंजाळ , वकील समीर लामखडे, चंद्रकात एनगंदूल, झावरे, राजाभाऊ अवसक, वकील रंजना गंवादे,राजा कांदळकर , अनिकेत घुले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास प्रा.उल्हास पाटील, प्रा.संतोष पवार, वकील प्रदीप मालपाणी, प्रा. संजय दळवी, माजी प्राचार्य के. के. देशमुख, प्रा.सुभाष माळवदकर, श्रीनिवास पगडाल, विनय सावंत, अशोकराव फंटागरे, प्रा.उज्ज्वला सहाणे, प्रा.श्रीनिवास हेमाडे,अर्जून वाळके उपस्थित होते.