आपला जिल्हा

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर ‘मराठा समाज चिंतनातून चिंतामुक्तीकडे’ पुस्तकाच्या वितरण शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर ‘मराठा समाज चिंतनातून चिंतामुक्तीकडे’ पुस्तकाच्या वितरण शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर ‘मराठा समाज चिंतनातून चिंतामुक्तीकडे’ पुस्तकाच्या वितरण शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

Raygad vijay kapse दि. ६ जून २०२६ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साजऱ्या झालेल्या शिवराज्याभिषेक दिनी दुर्गराज रायगडावर अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लाखो शिवभक्त, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींनी रायगडावर उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. या शिवमय वातावरणात ‘मराठा समाज चिंतनातून चिंतामुक्तीकडे – मराठ्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन’ या पूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या वितरण शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जाहिरात

मराठा उद्योजक परिवार, साईवेद प्रकाशन, शिवसूर्य सह्याद्री (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने साहित्य प्रचार व जनजागृतीसाठी किल्ले रायगडावर तसेच रायगडाच्या पायथ्याशी विविध ठिकाणी विशेष स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी येणाऱ्या शिवभक्त, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना पुस्तकाचा उद्देश, मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी मांडलेले विचार तसेच उद्योजकता व सामाजिक विकासाबाबत मार्गदर्शन याविषयी माहिती देण्यात आली. स्वयंसेवकांनी माहितीपत्रके व हँडबिलचे वितरण करून पुस्तकाबाबत व्यापक जनजागृती केली.

जाहिरात

शिवराज्याभिषेक दिनाच्या या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यादरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण रायगड परिसर शिवमय झाला होता. या पार्श्वभूमीवर पुस्तकाच्या वितरण उपक्रमास शिवप्रेमी, साहित्यप्रेमी, उद्योजक आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जाहिरात

या प्रसंगी लेखक कैलासराव तुरकणे-पाटील, प्रा. निलेश घोलप, प्रशांत आहेर, शांतीनाथ विखे, विजय विखे, डॉ. राहुल सलालकर, प्रा. बाळासाहेब जाधव, प्रा. सुदेश थोरात, चंद्रकांत लबडे महाराज, प्रणित फटांगरे, वैभव तुरकणे, प्रतिक तुरकणे तसेच मराठा उद्योजक लॉबीचे मराठवाडा प्रमुख राजेंद्र अवताडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य मुद्रण व प्रकाशन कार्यात संपादक करण नवले, सौरभ घोगरे आणि विकास तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.

पुस्तक विक्री व वितरणासाठी उपलब्ध असून इच्छुक वाचक, उद्योजक, विद्यार्थी आणि समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुस्तकाची प्रत मिळविण्यासाठी इच्छुकांनी ८४८४८३०१११ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा (www.sahakarstree.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे