राष्ट्रीय थांग-ता’मार्शल आर्ट स्पर्धेत यश सांगळेला ब्राँझ मेडल
राष्ट्रीय थांग-ता’मार्शल आर्ट स्पर्धेत यश सांगळेला ब्राँझ मेडल
राष्ट्रीय थांग-ता’मार्शल आर्ट स्पर्धेत यश सांगळेला ब्राँझ मेडल

कोपरगाव विजय कापसे दि 8 ऑक्टोबर २०२४– मध्यप्रदेश येथील ग्वाल्हेर येथे सुरू असलेल्या ३० व्या राष्ट्रीय ‘थांग-ता’ मार्शल आर्ट स्पर्धेत कोपरगाव शहरातील अजून एक स्पर्धक यश संजय सांगळे यास ब्राँझ मेडल मिळाले आहे .काल याच स्पर्धेत आपल्या कोपरगावची सुकन्या,श्रावणी गाडे हिला ही ब्राँझ मेडल मिळाले होते..यश सांगळे याच्या या यशाने नक्कीच कोपरगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘थांग-ता’ हे मणिपूरचे ‘मार्शल आर्ट’ (युद्ध कला) आहे. मणिपुरी भाषेत ‘ थांग ‘ म्हणजे तलवार आणि ‘ता ‘ म्हणजे भाला. ही भारतीय पारंपरिक युद्ध कला आहे , जी क्रिडा प्रकारात देशभरात खेळली जाते. वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय थांग-ता’स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केलेल्या विजयी स्पर्धकांसाठी मध्य प्रदेशातील ‘ग्वाल्हेर ‘येथे ३० व्या राष्ट्रीय ज्युनिअर थांग-ता चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.. देशभरातील सुमारे ४०० स्पर्धक येथे आले आहेत. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील, कोपरगाव शहरातील प्रसिद्ध समाजसेवक श्री विजय सांगळे यांचा पुतण्या यश संजय सांगळे याने महाराष्ट्र राज्याच्या संघातून ब्रॉंझ (कांस्य)पदक पटकावत घवघवीत यश संपादन करत राज्याचा अभिमान वाढविला आहे.

यशच्या या यशस्वी कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्या थांग ता संघटनेचे सचिव प्रा. सुदर्शन पांढरे, स्नेहल पांढरे, वर्षा देठे , शितल मंजुळ यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेत यश ऑल महाराष्ट्र राज्य थांग ता संघटनेचे प्रमुख महावीर धूळधर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य संघाकडून सहभागी झाला तर महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक रूपाली जहागीरदार यांनी स्वतः राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान यशला प्रोत्साहित करून त्याला ब्राँझ मेडल मिळविण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन केले. यशस्वी यशचे अहील्यानगर जिल्हा व ऑल महाराष्ट्र राज्य थांग ता संघटनेने अभिनंदन करता भावी वाचालीस शुभेच्छा दिल्या आहे.




