आमदार काळे यांच्या खोट्या वल्गनांना कंटाळून अनेकांचा कोल्हे गटात प्रवेश
आमदार काळे यांच्या खोट्या वल्गनांना कंटाळून अनेकांचा कोल्हे गटात प्रवेश
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १४ ऑक्टोबर २०२४– ब्राम्हणगाव येथे काळे गटाला खिंडार पडले असून आमदार काळे यांच्या फसव्या कार्यशैलीवर नाराज होऊन अनेकांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे विश्वासू नेतृत्व स्वीकारले आहे.निवडणूक तोंडावर असताना हजारो कोटींचे केवळ आकडे आहेत मात्र प्रत्यक्षात कुठेही नागरी सुविधा नाहीत. रस्ते अक्षरशः फुटले असून दळणवळण अडचणीचे झाले आहे यामुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत.यामुळे अनेकांचा ओढा कोल्हे गटात वाढला आहे.
जाहिरात
यावेळी माजी सरपंच सोमनाथ आसणे, ज्ञानेश्वर आसने, देवदत्त आसने, संदीप आसने, नामदेव बनकर ,अशोक बनकर,सूर्यभान वाकचौरे आदींसह अनेकांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कोल्हे गटात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्वांचे स्वागत करून विरोधकांच्या फसव्या धोरणाने त्यांना जनता वैतागली आहे.सर्वांचा रोष आमदार काळे यांच्यावर वाढला आहे.जाहिरात
प्रामाणिक पणे सेवा हाच धर्म मानून आपण काम करतो आहोत.विरोधकांनी पाणी घालवून तालुक्याचे नुकसान केले.कॅनॉल दुरुस्तीचे नाटक करून वेळ मारून नेण्याचे काम केले.खोट्या वल्गना या जास्त काळ टिकणार नाही कारण कुठेही कामे धड झालेली नसून भ्रष्ट्राचार बोकाळला आहे.याचे उत्तर जनता त्यांना आगामी काळात देईल.कोल्हे गटात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे कारण तालुक्यातील सर्वात मोठा राजकीय गट कोल्हे गट आहे.