जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांने अर्थशास्त्रात मिळवली पीएचडी
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांने अर्थशास्त्रात मिळवली पीएचडी
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २७ सप्टेंबर २०२५– कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद करंजी बुद्रुक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानोबा दत्ता चव्हाण यांनी नुकतीच संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांच्याकडून अर्थशास्त्र विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे पीएचडी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जाहिरात
या निमित्त नुकताच करंजी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते कारभारी आगवन, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवन, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब भिंगारे, उपाध्यक्ष एकनाथ कापसे, योगेश आगवन, बाबासाहेब आगवन, संजय शिंदे, गणेश फापाळे, मुकुंद आगवन तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भाकरे, सलीम शेख, बाळू दिंधाळे, सुमित हांडे, दीपक तुंगार,दीपक दवणे, आदिनाथ जपे, संगीता सांबरे, स्तुती मिरजकर, जयश्री मोगरे, बेबी कराळे आदींनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.जाहिरात