मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५० किलोमीटर रस्त्यांना मंजुरी- आशुतोष काळे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५० किलोमीटर रस्त्यांना मंजुरी- आशुतोष काळे
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५० किलोमीटर रस्त्यांना मंजुरी- आशुतोष काळे
कोपरगाव विजय कापसे दि १५ ऑक्टोबर २०२४:- कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील बहुतांश रस्त्यांचा विकास झालेला असून नागरिकांच्या मागणीनुसार ज्या रस्त्यांचा विकास होणे अपेक्षित होते त्या रस्त्यांना देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून ५० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश असून रामा ७ ते कारवाडी रास्ता ग्रा.मा.२७ (३.४७ कि.मी)., संवत्सर,कासली, शिरसगाव रस्ता इजिमा-३ (१०.५० कि.मी.), जळगाव शेळके वस्ती वाकडी ते धनगरवाडी ते दिघी तालुका हद्द रस्ता ग्रा.मा.६५, ग्रा.मा.६७, इजिमा ४६ (८.१४ कि.मी.), नपावाडी ते पुणतांबा रस्ता इजिमा १६ (१.९१ कि.मी.), शिंगवे ते नथु पाटलाची वाडी रस्ता इजिमा.२१७ (६.४६ कि.मी.), वारी ते जिल्हा हद्द रस्ता खोपडी ग्रा.मा.५१ (३.७५ कि.मी.), टाकळी ते ब्राह्मणगाव रस्ता ग्रा.मा.८४ (३.९२ कि.मी.),उक्कडगाव ते तळेगाव मळे रस्ता इजिमा.८ (७.५० कि.मी), तळेगाव मळे ते खोपडी रस्ता इजिमा-२१४ (५.२५ कि.मी.) अशा एकूण ५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील सर्व मुख्य रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून यातील रस्त्यांचा विकास करण्यात यश मिळविले. ज्या ज्या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे त्या रस्त्यांना विविध योजनेतून निधी कसा मिळविता येईल यासाठी पाठपुरावा करीत होतो. या रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यांच्या निधीची तरतूद होवून या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा खराब रस्त्यांचा त्रास कायमचा दूर होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.