आपला जिल्हा

सिंह हा जंगलचा राजा तो सर्वांना सोबत घेऊन चालतो. टायगर हा स्वार्थी तो एकटाच चालतो – आमदार सत्यजित तांबे

सिंह हा जंगलचा राजा तो सर्वांना सोबत घेऊन चालतो. टायगर हा स्वार्थी तो एकटाच चालतो – आमदार सत्यजित तांबे

संगमनेर मधील विराट सभेतून विरोधकांवर जोरदार टीका

संगमनेर प्रतिनिधी दि २९ नोव्हेंबर २०२५संगमनेर तालुक्यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात हे सर्वांना सोबत घेऊन चालतात. काल कोणीतरी आले आणि म्हटले की टायगर आला. टायगर हा स्वार्थी असतो तो एकटा येतो मात्र सिंह हा जंगलचा राजा असून तो सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि संगमनेर मध्ये सिंह हे बाळासाहेब थोरात आहेत त्यामुळे बाकीच्यांनी लक्षात घ्यावे अशी टीका आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांवर केली आहे.

जाहिरात

संगमनेर सेवा समितीच्या वतीने नाशिक – पुणे रोडवर झालेल्या जाहीर सभेत आमदार सत्यजित तांबे यांनी नाव न घेता विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

जाहिरात

संगमनेर सेवा समितीच्या जाहीरनामा मांडताना पुढील पाच वर्षात करावयाचा नियोजनबद्ध विकास आराखडा सत्यजित तांबे यांनी मांडला. याचबरोबर हा माझा शब्द असून संगमनेरच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडणार नाही कारण लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा राज्यात होणारा आदर आणि त्यांचा मोठा वशिला आपल्याकडे आहे असे त्यांनी सांगितले.

याचबरोबर संगमनेर मध्ये काल एक जण येऊन गेला आणि टायगर आला असे म्हटले टायगर हा स्वार्थी असतो आणि तो एकटा येतो मात्र सिंह हा जंगलचा राजा असतो आणि तो सर्वांना सोबत घेऊन चालतो. राजकीय कार्यकर्त्यांनी करमणुकीचे भाषण करू नये तर विकासाच्या मुद्द्यावर बोलावे असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

जाहिरात

नवीन लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगतात परंतु संगमनेर मध्ये आपण अनेक विकास कामे यापूर्वीच मंजूर करून घेतली आहे. एमआयडीसी करता एप्रिल 2025 मध्ये आपण पत्र दिले त्यावर 26 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित विभागाचे पत्र मिळाले असून सर्वेचे काम सुरू आहे. संगमनेर शहरातील महिला हॉस्पिटल लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 28 जानेवारी 2020 म्हणजे 5 वर्षांपूर्वीच सर्व मंजूर करून ठेवले असल्याचे त्यांनी कागदपत्रांसह सांगितले. नवीन लोकप्रतिनिधीला विकास कामांबाबत काहीच माहिती नाही. अभ्यास नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विकास कामासाठी 50 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगून त्यांच्या प्रति कायम आदर असल्याचे ते म्हणाले.

यंग नॅशनल ग्राउंडचे काम 5 डिसेंबर रोजी सुरू करणार

यंग नॅशनल ग्राउंड साठी आपण एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. कामाचे भूमिपूजन केले मात्र याचे श्रेय मला मिळू नये म्हणून काही लोकांनी त्याला स्टे आणला. स्टे आणणारे कोण आहे तुम्हाला माहित आहे. निवडणुकीनंतर 5 डिसेंबर रोजी या कामाला सुरुवात करणार असून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाप्रमाणे अत्यंत आदर्श क्रीडा संकुल त्याठिकाणी उभारले जाईल असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे