शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन घेतली प्रवेशाची माहिती
शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयात जाऊन घेतली प्रवेशाची माहिती
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ११ जुलै २०२५–सध्या सर्वच महाविद्यालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता अनेक विद्यार्थ्यांची मोठी लगभग सुरू असून याच प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेनेचे कोपरगाव शहर प्रमुख पै.गगनभैया हाडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन प्रशासनाची भेट घेत माहिती जाणून घेतली.
जाहिरात
शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव शरीरातील एस.एस.जी.एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे व के.जे.सोमेया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय ठाणगे तसेच प्रवेश समिती सदस्यांची युवासेनेचे कोपरगाव शहर प्रमुख पै गगनभैया हाडा, निखिल कंक्राळे, कान्हा हाडा, वैभव शेलार, पियुष सैंदाणे, विनायक टाक, मंगेश रघुवंशी, दिनेश मरसाळे, याकुब शेख, समीर पेंटर आत्तार, बाबू हाडा, दीपेश वाघमारे, साहिल पटवेकर, चेतन हाडा, रितेश वाघिले, रियान शेख, राहुल हाडा, सोहेल पठाण, शहाबाज शहा आदी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेत माहिती जाणून घेतली.जाहिरात
या विषयी शहरप्रमुख हाडा यांनी माहिती देतांना सांगितले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ध्येयधोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या नुसार कोपरगाव युवा सेना कार्य करत असून सध्या सर्वच महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना अडचणी येत असतात त्यावर महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य ते सहकार्य मार्गदर्शन करावे आदि विषयावर चर्चा होऊन महाविद्यालयीन प्रशासनाने देखील विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेशाबाबतीत येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सर्वत सर्वोत्तपरी सहकार्य करत असल्याचे सांगितले असता यावर युवासेना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत सर्व महाविद्यालयीन प्रशासनाचे आभार व्यक्त केले.