एस एस जी एम कॉलेज

एस .एस .जी .एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा विभागात घवघवीत यश

एस .एस .जी .एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा विभागात घवघवीत यश

एस .एस .जी .एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हा क्रीडा विभागात घवघवीत यश

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑक्टोबर २०२४गुरुवार दिनांक १७  व शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४  या कालावधीत श्रीरामपूर येथील रावबहादूर  नारायणराव बोरावके महाविद्यालयात संपन्न झालेल्या अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग आंतर महाविद्यालयीन मैदानी मुले व मुलींच्या अथेलेटिक्स स्पर्धेत कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात नावलौकिक मिळविला आहे.

जाहिरात

या स्पर्धेत महाविद्यालयातील  आस्मा पठाण हिने हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी धावणे) मध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक मिळविले. ओम चौधरी याने लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत  रौप्य पदक मिळविले,  वैष्णवी दरेकर हिने १०० मीटर हर्डल्स मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले. अलीशा निकाळे हिने थाळी फेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक, तर हातोडा फेक मध्ये तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक मिळविले आहे. तसेच  ४× १०० रिले या सांघिक क्रीडा प्रकारात मुलींचा संघाने द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर यातील  कोल्हे अंजली, बनकर आस्था, गौरी कळसकर, वैष्णवी दरेकर या विद्यार्थीनींनी रौप्यपदक मिळवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

महाविद्यालयातील या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ यश संपादन केल्याबद्दल त्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा संचालक प्रा. डॉ. विशाल पवार यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन  ऍड. भगीरथ शिंदे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे,  महाविद्यालय विकास समितीचे  सर्व सदस्य, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत सर्व विभाग प्रमुख, कार्यालय अधिक्षक  सुनील गोसावी, सिनियर, ज्युनिअर व किमान कौशल्य विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सर्व स्पर्धकांचे  हार्दिक अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे