कोपरगाव स्ट्रॉंगरूमला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट
कोपरगाव स्ट्रॉंगरूमला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट
कोपरगाव स्ट्रॉंगरूमला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट
कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२४– जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कोपरगाव येथील सेवा निकेतन इंग्लिश स्कूल येथे स्थापन केलेल्या स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
याप्रसंगी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, संदीप कोळी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप आदीसह निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मतदान व मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम यंत्राचे वाटप व जमा करण्यासाठी पुरेसा जागेची उपलब्धता याबाबत प्रशासनाने केलेले नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेल्या निवडणूक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. निवडणूक नियमांचे कटाक्षाने पालन करावे, मनुष्यबळ आणि मतदान केंद्रावरील सुविधांचे योग्य नियोजन करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी ईव्हीएम सुरक्षिततेच्यादृष्टीने परिसराची पाहणी करून आवश्यक पोलीस मनुष्यबळाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.