एम के आढाव विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन जल्लोषात संपन्न
एम के आढाव विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन जल्लोषात संपन्न
एम के आढाव विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन जल्लोषात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २६ डिसेंबर २०२४–कोपरगाव नगरपालिकेचे माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालय आयोजित पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन (तबला वादक) रंगमंच कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ २०२४-२५ मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी मुख्याधिकारी सुहास जगताप, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शबाना शेख नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी श्रीराम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रमाची सुरवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व जगप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण स्व. उस्ताद जाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहत रंगमंचाचे पूजन करून व दीप प्रजवलनाने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवर नगरपालिका सहाय्यक रचनाकार अश्विनी पिंगळे, बांधकाम विभागाच्या श्रीमती प्रधान मॅडम, सखी सावित्री मंचच्या सदस्या वर्षा झंवर, ऍड श्रद्धा जवाद, आशासेविका मंगल गवळी, ज्योती मरसाळे, प्रीती बनकर व नगरपालिका शिक्षण मंडळ विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळेचे स्कूल बस चालक सुरेश काळे तसेक वॉचमन पंकज कोपरे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी विविध स्पर्धेत तसेच शालांत परीक्षेत विशेष यश संपादित केलेले विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनीनी विविध कलाविष्कार, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक विद्यार्थी यांचे मने जिंकली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेचे कौतुक केले आहे.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेच्या मुख्याध्यापिका भावना खैरनार, स्वागत व सूत्रसंचालन अर्चना बोराडे तर आभार आभार प्रमोद लष्करे यांनी मानले आहे. , यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकतर कर्मचारी,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.