नितीनराव औताडे
शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसेना जिल्हाप्रमुख औताडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
कोपरगाव विजय कापसे दि २६ डिसेंबर २०२४– मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम करत असताना शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केली. तळागाळातील जनतेपर्यंत विविध योजना पोहोचविल्या. त्यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये मोठी इन्कमिंग सुरू आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात व शहरातील प्रभागात शिवसेना शाखा स्थापन केली पाहिजे. पक्ष संघटनेसाठी एकनाथ शिंदे हे ताकद देणारं नेतृत्व असल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संजीव भोर यांनी कोपरगाव येथे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीनराव औताडे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करताना बोलत होते.
कोपरगाव काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुनील साळुंके, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण फुमकर, काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष सागर बारहाते, अमोल लोखंडे, विशाल पिंगळे ,आदित्य गरुड, अभिषेक शिंदे अदी सह कोपरगाव येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रभावित होऊन धनुष्यबाण हाती घेतले आहे. काल शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश करून घेण्यात आला.
यावेळी महिला शिवसेना जिल्हाप्रमुख विमल पुंडे, शिवसेना शहर प्रमुख अक्षय जाधव, उपजिल्हाप्रमुख मनिल नरोडे,देवा लोखंडे, सनी गायकवाड, बाबासाहेब बढे, ज्ञानेश कपिले, निलेश चौधरी ,कैलास आसणे, ऋषिकेश बारहाते ,विनोद गलांडे अदीसह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर जनसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे येते. सर्व घटकां पर्यंत विकास कामे करून त्यांनी जनतेचे प्रेम मिळवले.उत्तर नगर जिल्हा प्रस्थापितांचा जिल्हा असून यांच्या विरोधात काम करण्यासाठी हिंमत लागते. ती हिंमत शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे असेही औताडे यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोपरगावात भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी केला.