आपला जिल्हा

गणेश परिसराच्यावतीने आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार

गणेश परिसराच्यावतीने आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार

आम्हाला सुसंस्कृत आमदार मिळाला, गणेश परिसराची भावना

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ मे २०२६विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवानेते आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राहाता येथील वीरभद्र महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे मित्र मंडळ व गणेश परिसराच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात

स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शेतकरी हितासाठी घेतलेले ठाम निर्णय, सहकार क्षेत्रातील योगदान आणि जनतेशी जपलेली नाळ यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांचाच जनहिताचा आणि संघर्षशील वारसा पुढे नेत आमदार विवेक कोल्हे यांनी अल्पावधीत सहकार, समाजकारण आणि युवक नेतृत्वाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जाहिरात

शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी धडाडीने काम करणारे नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांच्याकडे पाहिले जात आहे. गणेश कारखाना निवडणुकीत त्यांनी दाखवलेले प्रभावी नेतृत्व राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या नेतृत्वाला आता विधान परिषदेच्या माध्यमातून अधिक बळ मिळाल्याने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या नागरी सत्कार सोहळ्यास राहाता तालुक्यासह गणेश परिसरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील जनतेच्या प्रेमातून आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा सोहळा उत्साहात पार पडणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे