कोपरगावात प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबीर सुरु
कोपरगावात प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबीर सुरु
कोपरगावात प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबीर सुरु
कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२४ :- महिलांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाला सोमवार (दि.२३) पासून ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबिराने सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या हस्ते या ‘योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी चैतालीताई काळे म्हणाल्या की, दरवर्षी आदिशक्ती अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाचेवेळी महिलांसाठी खास आकर्षण असलेल्या दांडिया खेळाचे महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला आहे. या नृत्यप्रकाराची समाजात लोकप्रियता आहे आणि युवा पिढीला देखील या नृत्याचे आकर्षण असून शारदीय नवरात्र काळात शहर असो ग्रामीण भाग या दांडिया नृत्याचा बोलबाला असतो.दांडिया नृत्याबरोबरच आरोग्य देखील अबाधित राहावे यासाठी योग शिबीराच्या माध्यमातून योग प्रशिक्षक मोलाचे मार्गदर्शन करतात. योग व दांडिया यांचा मिलाफ होवून महिलांचे आरोग्य उत्तम राहत असून शरीर निरोगी आणि मन शांत ठेवायला मोठी मदत होते. त्यामुळे दरवर्षी या योग व दांडिया प्रशिक्षण’ शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी योग प्रशिक्षक अभिजित शहा सर, दांडिया प्रशिक्षक वैभवी मखिजा, खुशबू पटेल, उमा वहाडणे, मीनलताई खांबेकर, माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, माधवी वाकचौरे, मंगल आढाव, रमाताई पहाडे, पूनम विसपुते, सीमा पानगव्हाणे, स्वप्नजा वाबळे, रश्मी कडू, छाया फरताळे, सुनिता खैरनार, लक्ष्मी हलवाई आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.