आपला जिल्हा

फायनान्स डिसीप्लीन’ प्रत्येकासाठी महत्वाचे – सीए प्रशांत रूणवाल

फायनान्स डिसीप्लीन’ प्रत्येकासाठी महत्वाचे – सीए प्रशांत रूणवाल

सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्कचे चर्चासत्र संपन्न
संगमनेर विजय कापसे दि १५ मे २०२५सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्क (SLBN) च्या वतीने संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट येथे “फायनान्स डिसीप्लीन” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून मालपाणी ग्रुपचे मुख्य आर्थिक सल्लागार सीए प्रशांत रूणवाल यांनी उपस्थित उद्योजकांसमोर प्रभावी व सोप्या भाषेत आर्थिक शिस्तीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी जिल्हापाल आणि MCC (2020-21) लायन गिरीश मालपाणी उपस्थित होते.

जाहिरात
कार्यक्रमाची सुरुवात SLBN चे अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, सचिव प्रशांत गुंजाळ व सर्व सभासदांच्या उपस्थितीत झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुदीप हासे यांनी सीए प्रशांत रूणवाल यांचा कार्यपरिचय सादर केला. सन १९९९ पासून चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या रूणवाल सरांना एकूण ३४ वर्षांचा अनुभव असून, ते मालपाणी ग्रुपच्या विविध आर्थिक निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे सल्लागार आहेत. Imagicaa प्रकल्पाच्या यशस्वी अधिग्रहणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून, त्यांना मालपाणी ग्रुपकडून ‘लेगसी अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

जाहिरात

फायनान्स डिसीप्लीन या विषयावर बोलताना रूणवाल यांनी सांगितले की कोणताही व्यवसाय असो – एकहाती, कौटुंबिक, भागीदारी अथवा कंपनी – प्रत्येक पातळीवर आर्थिक शिस्त गरजेची आहे. आर्थिक उद्दिष्टे SMART (स्पष्ट, मोजता येणारी, अमलात आणण्यासारखी, वास्तववादी आणि कालबद्ध) असावीत. रोजच्या आर्थिक व्यवहारांचे नोंदीकरण, बँक व खाती यांची नियमित जुळणी, वयोमानानुसार गुंतवणुकीचे नियोजन, तसेच ताळेबंद, प्राप्ती-देणी आणि इन्व्हेंटरी यांचे वेळोवेळी विश्लेषण करणे हे अत्यावश्यक आहे.

जाहिरात

गुंतवणूक करताना “१०० – वय” हा नियम त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केला आणि अति जोखमीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. जोखीम व्यवस्थापन म्हणजे केवळ विमा न घेता, व्यवसाय व वारशाशी संबंधित जोखीमेची कल्पना घेऊन नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, ‘7M + 1’ म्हणजे Money, Men, Material, Minute, Method, Market, Management आणि Moral – या आठ गोष्टी कोणत्याही यशस्वी व्यवसायाच्या मुळाशी असतात असे मत त्यांनी मांडले.

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष लायन श्रीनिवास भंडारी यांनी बिझनेस नेटवर्कच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानवृद्धीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अशा चर्चासत्रांमुळे सदस्यांना केवळ आर्थिक ज्ञानच नव्हे तर परस्पर अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. यावेळी लायन गिरीश मालपाणी यांचा सत्कार लायन प्रशांत गुंजाळ यांनी केला, तर सीए प्रशांत रूणवाल यांचा सत्कार अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांच्या हस्ते झाला. आभार प्रदर्शन लायन प्रशांत गुंजाळ यांनी केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे