भोजडे ग्रामस्थांच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करत स्व.कोल्हे यांना अभिवादन
संबंध तालुक्यात विविध उपक्रमांनी प्रेरणा दिन साजरा
जाहिरात आत्मा
कोपरगाव विजय कापसे दि २५ मार्च २०२५– कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीला मिळावी या उद्देशाने कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रेरणा दिन साजरा करत गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत अभिवादन करण्यात आले.
जाहिरात
या प्रसंगी ज्ञानेश्वर सिनगर,प्रकाश गायकवाड, प्रमोद सिनगर, रंगनाथ सिनगर, बाळासाहेब सिनगर, संजय सिनगर, देवराम मंचरे,वाल्मीक बोर्डे, भाऊसाहेब सिनगर, मंगेश सिनगर, विनायक सिनगर, बाबासाहेब मंचरे, संपत सिनगर,सुरेश सिनगर, बाजीराव सिनगर, अशोक सिनगर, बाबासाहेब सोनवणे यासह गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ढेपले सर तसेच सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे काजळे सर व त्यांचे सर्व शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जाहिरात
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे या कोपरगाव तालुक्यासह राज्यभरातील तळागाळातील लोकांसाठी केलेल्या कार्याची तसेच शिक्षण, सहकार, कला, शेती अशा सर्वच क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत साहेब आपण चिरकाल आमच्या सोबत आहात अशा भावना व्यक्त केल्या.जाहिरात