आपला जिल्हा

नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्‍या वतीने जाहीर पाठिंबा

नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्‍या वतीने जाहीर पाठिंबा

नामदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्‍या वतीने जाहीर पाठिंबा

लोणी विजय कापसे दि १७ नोव्हेंबर २०२४शिर्डी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांना अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्‍या वतीने पाठींबा देण्‍यात आला असून, त्‍यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्‍याचे आवाहन प्रदेशाध्‍यक्ष दत्‍ताभाऊ खेमनर यांनी केले आहे.

जाहिरात

       अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्‍या वतीने पाठींब्‍याचे पत्र मंत्री विखे पाटील यांच्‍याकडे सुपूर्त करण्‍यात आले. आश्‍वी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या महायुतीच्‍या सभेमध्‍ये परिषदेच्‍या वतीने ना.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

जाहिरात

       परिषदेच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे की, मंत्री विखे पाटील यांनी समाजातील सर्व समाज घटकांना बरोबर घेवून त्‍यांच्‍या  न्‍याय हक्‍कांसाठी सहकार्य करण्‍याची भूमिका घेतली. राज्‍यामध्‍ये पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून धनगर समाजातील तरुणांकरीता महामेश योजना सुरु केली असून, महायुती सरकारने समाजा करीता अहिल्‍यादेवी होळकर घरकुल योजना, धनगर समाजातील मुलांना इंग्रजी माध्‍यमाचे मोफत शिक्षण प्रकारचे सामाजिक हिताचे निर्णय होण्‍यासाठी विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार हा समाजाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण ठरला आहे.

जाहिरात

       आपल्‍या जिल्‍ह्याल अहिल्‍यानगर नाव देण्‍याकरीता राज्‍य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन, निर्णय होण्‍याकरीता ना.विखे पाटील यांचा पुढाकार महत्‍व्‍पूर्ण राहीला. त्‍यामुळेच समाजातील सर्व बांधव महायुतीच्‍या प्रचारामध्‍ये सक्रीयतेने सहभागी झाले असून, शिर्डी विधानसभा मतदार संघातून मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांना विजयी करण्‍यासाठी संघटना प्रयत्‍न करणार असल्‍याचे दत्‍ताभाऊ खेमनर यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे