अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा
अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा
अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना जाहीर पाठिंबा
लोणी विजय कापसे दि १७ नोव्हेंबर २०२४– शिर्डी मतदार संघाच्या सर्वांगीन विकासासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले योगदान हे खुप महत्वपूर्ण असून अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघातील विकास प्रक्रीयेला भविष्यातही साथ मिळावी म्हणून अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने मंत्री विखे पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे.
संघटनेचे संस्थापक प्रविण कानवडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख विशे, तालुका अध्यक्ष सुनिल घोगरे यांनी मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून आपला पाठींबा जाहीर केला. या संदर्भात दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिर्डी मतदार संघामध्ये विकास कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून झालेले महत्वपूर्ण निर्णय पाहाता शिर्डी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलत असून, तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीला मिळालेली मंजुरी, खंडकरी शेतक-यांच्या जमीनींचा सुटलेला प्रश्न तसेच महायुती सरकारच्या विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणी करीता मंत्री विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
भविष्यातही समाजाच्या प्रश्नांकरीता ना.विखे पाटील यांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या विजया करीता संघटनेचे सर्व पदाधिकारी सक्रीयपणे ना.विखे पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे पाठींब्याच्या पत्रात म्हटले आहे .