ऐतिहासिक स्मारके स्वच्छ ठेवून जतन करण्याचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन
ऐतिहासिक स्मारके स्वच्छ ठेवून जतन करण्याचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन
कोपरगांव तालुक्यातील रवंदे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन
कोपरगाव विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५–छत्रपती शिवाजीराजे यांचे सह राजे-महाराजे, सरदार, यांनी उभारलेल्या गड किल्ले,राजवाडे, गढी ही ऐतिहासिक स्मारके असून प्रेरणादायी असल्याचे त्याची सर्वांनी स्वच्छता ठेवून जतन करण्यांचे आवाहन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी काॅमर्स महाविद्यालय वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कोपरगांव तालुक्यातील रवंदे या गावी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचे हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
श्री.स.ग.म.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली सात दिवसांच्या निवासी शिबीरात “स्वच्छता, पर्यावरण आणि निर्मळ नैसर्गिक जलस्रोत” या विषयावर महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळासाहेब गायकवाड , प्रा. डॉ.बंडेराव त-हाळ, प्रा. महेश दिघे, प्रा. अंकिता प्रसाद, या शिबीरात सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, रवंदे ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके पुढे म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण संतुलन महत्त्वाचे आहे. वृक्षारोपण आणि पालकत्व ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवावे. असे आवाहन करत व्याख्यानाचे अवलोकन आणि पत्र लेखन सांगितले.सेवा योजनेची छात्र शितल कदम गीत सादर केले. सूत्रसंचालक पुजा जोशी, वैष्णवी घुमरे यांनी केले.