मंजूर ट्रान्सफॉर्मर बसवा अन्यथा उपोषण; रवंदे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा
मंजूर ट्रान्सफॉर्मर बसवा अन्यथा उपोषण; रवंदे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा
मंजूर ट्रान्सफॉर्मर बसवा अन्यथा उपोषण; रवंदे ग्रामस्थांचा महावितरणला इशारा
कोपरगाव विजय कापसे दि २२ जानेवारी २०२५–तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या रवंदे सब स्टेशनचा मंजुर झालेला पाच एम.व्ही.ए. उच्च दाबाचा ट्रान्सफॉर्मर अद्याप पर्यंत न बसविल्यामुळे सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा रवंदे ग्रामस्थ व शिवसेना पक्षातर्फे देण्यात आला आहे.
मा.कार्यकारी अभियंता,विभाग संगमनेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रवंदे सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रवदे, मळेगांव थडी, सांगवी भुसार या गांवामध्ये शेतीचे कृषी पंप हे अपुऱ्या वीज पुरवठा होत असल्याने अजिबात चालत नाही, त्यामुळे परिसरातील कांदा , गहू आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. आतापर्यंत आम्ही कोपरगांव येधील अधिकारी आणि संगमनेर येथे वारंवार संपर्क करून आमच्या मागण्या संदर्भामध्ये लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही याची आपण नोंद घ्यावी.
शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ च्या आत आम्हाला आपल्या विज वितरण कंपनीच्या रवंदे सब स्टेशनला नविन पाच एम.व्ही.ए.था ट्रान्सफॉर्मर न बसविल्यास सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ पासून रवंदे सब स्टेशन येथील कार्यालयात आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत, जो पर्यंत रवंदे सब स्टेशनमध्ये पाच के.व्ही.ए.चा ट्रान्सफॉर्मर बसवुन कार्यान्वीत होत नाही तो पर्यंत आमचे बेमुदत आमरण उपोषण चालुच राहील. तसेच या दरम्यान आमचे गाव व परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला आपण, आपली वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असेही म्हटले आहे.
निवेदनावर प्रवीण शिंदे, दत्तात्रय शिंदे, ताराचंद दवंगे, जीवन बडदे,ज्ञानेश्वर दवंगे, बाबासाहेब खोंड,विकास बडदे ,यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.