आपला जिल्हा

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी कृती

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी कृती
कलेतून कमावलेले १ लाख रुपये ‘साई आश्रया’ अनाथाश्रमाला अर्पण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ६ नोव्हेंबर २०२५: समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा समाजाप्रती आपली संवेदनशील जबाबदारी जपत करुणेचा नवा अध्याय लिहिला आहे. दीपावलीनिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये  नुकताच पार पडलेला ‘Art Volcano – 2.0’ हा भव्य कलोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी चेअरमन धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले होते.

जाहिरात
या प्रदर्शन-विक्रीतून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तकलेच्या वस्तू विकून मिळालेली १ लाख रुपयांची रक्कम ‘साई आश्रया’ अनाथाश्रमातील निराधारांच्या मदतीसाठी समता इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने प्रदान करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ कला साकारली नाही, तर समाजाशी नातं घट्ट जोडण्याचा मौल्यवान धडा घेतला. प्रत्येक निर्मितीतून त्यांच्या कल्पकतेसोबतच संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान प्रकट झाले. समता इंटरनॅशनल स्कूलने शिक्षणाला मानवी मूल्यांची जोड देत शिकत असतानाच विद्यार्थी दशेतच समाजासाठी काहीतरी करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला आहे.

जाहिरात
कार्यकारी विश्वस्त स्वाती संदीप कोयटे भावना व्यक्त करताना म्हणाल्या की, “Art Volcano – 2.0 हा फक्त एक कलोत्सव नाही, तर विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि माणुसकीचा उत्सव आहे. त्यांच्या कलेतून उमटलेली समाजसेवेची भावना हीच दिवाळीच्या खऱ्या प्रकाशाची अनुभूती आहे.”

जाहिरात
तसेच प्राचार्य समीर अत्तार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या कलेतून व्यक्त झालेली समाज भावना हीच समता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक प्रवासाची खरी दिशा आहे. या १ लाख रुपयांच्या मदतीत करुणा, जबाबदारी आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम दिसतो. शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नव्हे, तर मनात माणुसकी जागवण्याची प्रक्रिया आहे.”

जाहिरात
‘साई आश्रया’ अनाथाश्रमासाठी विद्यार्थ्यांनी १ लाख रुपयांची मदत सुपूर्द करताच सभागृहात भावनिक वातावरण तयार झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी आणि डोळ्यांत अभिमानाची चमक दाटून आली. या कृतीतून विद्यार्थ्यांनी केवळ कला मांडली नाही, तर समाजाशी जोडलेली माणुसकीही उजळवली. ‘Art Volcano – 2.0’ ने या वर्षी कलेसोबत करुणेचा दीप प्रज्वलित करत शिक्षणाला मानवतेचा खरा अर्थ दिला. समताचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या हृदयस्पर्शी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
“विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि संवेदनशीलता हीच शिक्षणाची खरी शक्ती आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ बुद्धीमान नव्हे, तर मनानेही समृद्ध होतात. समाजासाठी काही करण्याची ओढ हेच आमच्या शिक्षणाचे खरे यश आहे.
समता इंटरनॅशनल स्कूल संस्थापक काका कोयटे 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे