आपला जिल्हा

आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे

आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे

आगामी निवडणुकीत सर्वोदूर महाविकास आघाडीचाच डंका-ॲड.संदीप वर्पे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ नोव्हेंबर २०२५-    गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका,महानगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे शेतकरी संकटात असताना सरकार फक्त पक्ष वाढीकडे लक्ष देत असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते ॲड.संदीप वर्पे यांनी त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

 नुकतीच कोपरगावचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित असलेले ॲड.संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमवार दि ३ नोव्हेंबर रोजी कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता याप्रसंगी ते बोलत होते.

जाहिरात
 पक्षाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहळ्यास तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव, तालुका उपाध्यक्ष सुरेश असणे,तालुका सेल अध्यक्ष गोवर्धन सोनाळे, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल पवार, पश्चिम तालुका अध्यक्ष सुनील वर्पे, सल्लागार ॲड. गव्हाणे, संतोष वढणे, सोशल मीडिया शहराध्यक्ष ऋतुराज काळे, सामाजिक न्याय शहर अध्यक्ष गौतम बनसोडे,उपाध्यक्ष शुभम शिंदे, कार्याध्यक्ष युवक रिंकू मगर, शहर उपाध्यक्ष मजित पठाण, उपाध्यक्ष दिनेश पवार, तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात, ओवेस पठाण आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका व  शहर पदाधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी ॲड.संदीप वर्पे यांनी बोलताना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट असुन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णहता हतबल झाला आहेच आणि त्यात भर म्हणून की काय सरकारने तुटपुंजी मदत देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर संपूर्ण कर्जमाफी देत शेतकऱ्यांना जिवंत करावे अशी मागणी ॲड. संदीप वर्पे यांनी करत आगामी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवारच कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक लढवत मोठ्या मताने निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करत  महाविकास आघाडी पूर्ण ताकदिनिशी निवडणूकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे सांगितले.
कोपरगाव विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून मी उमेदवारी केली असता मला मतदारांनी देखील भरघोस मत रुपी आशीर्वाद शुभेच्छा दिल्या या सर्वांचा आणि या साठी अहोरात्र प्रयत्न करणारे माझे सहकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक, काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
कोपरगाव शहर आगामी नगरपालिका निवडणूकीत महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षानी वयक्तिक निर्णय घेत वेगवेगळे उमेदवार देण्याचे जाहीर केले असतांना मी  कोपरगावमधील  त्या दोन्ही पक्ष नेत्यांना भेटून महाविकास आघाडीचा सर्वानुमते एकच उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल आणि त्याला आपण  मोठ्या मताने निवडून आणू असा विश्वास ॲड.संदीप वर्पे हे त्यांना देणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे