आपला जिल्हा

आ.आशुतोष काळेंच्या भूमिकेचा इफेक्ट सडे पाठोपाठ बहादरपूर-रांजणगाव देशमुख रस्त्याचे काम सुरू

आ.आशुतोष काळेंच्या भूमिकेचा इफेक्ट सडे पाठोपाठ बहादरपूर-रांजणगाव देशमुख रस्त्याचे काम सुरू

आ.आशुतोष काळेंच्या भूमिकेचा इफेक्ट सडे पाठोपाठ बहादरपूर-रांजणगाव देशमुख रस्त्याचे काम सुरू

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६ कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची कामे मुजोर ठेकेदारांमुळे रखडली होती. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या दबंग भूमिकेचा चांगलाच इफेक्ट झाला असून सडे रस्त्याच्या पाठोपाठ बहादरपूर-रांजणगाव देशमुख (इजिमा२११) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात

बहादरपूर-रांजणगाव देशमुख (इजिमा२११) हा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात चिखल, खड्डे व धुळीमुळे वाहनचालक व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः शेतमालाची वाहतूक, शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा असल्यामुळे अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी ४.११ कोटी निधी दिला होता. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होवून ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु केले होते परंतु सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु होते त्यामुळे नागरीकांना अडचणी येत होत्या. मागील आठवड्यात आ.आशुतोष काळे यांनी संयुक्तपणे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार यांच्या बैठकीत रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतांना अधिकारी व ठेकेदारांची चांगलीच खरडपट्टी काढल्यामुळे दोनच दिवसात सडे फाटा ते सडे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले होते. व दोन दिवसापूर्वी बहादरपूर-रांजणगाव देशमुख या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु झाल्यामुळे हा आ.आशुतोष काळेंच्या भूमिकेचा इफेक्ट असल्याचे बोलले जात असून त्यांची हि भूमिका नागरीकांना भावली आहे.

जाहिरात

जनतेच्या प्रश्नांबाबत सजग असणारे व थेट कृती करणारे नेतृत्व म्हणून आ.आशुतोष काळे यांची ओळख आहे. ज्याप्रमाणे त्यांनी रस्त्यांच्या कामाबाबत ठोस भूमिका घेत दिलेला स्पष्ट शाऱ्यामुळे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी व ठेकेदार चांगलेच धास्तावले आहे. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात एकामागून एक रस्त्यांच्या कामांना सुरुवात होवून रस्त्यांची कामे पूर्ण होत आहेत त्यामुळे नागरीक सुखावले आहेत.यापुढेही आ.आशुतोष काळे यांनी अशीच भूमिका ठेवावी जेणेकरून त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघातील विकासाला अधिकची गती मिळणार आहे.-ज्ञानेश्वर गव्हाणे(मा.सरपंच)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे