आपला जिल्हा

संजीवनीच्या सहा अभियंत्यांना सॅप कोर्समुळे एक्सपावुंड टेक्निवो व झेन्सर टेक्नॉलॉजिज मध्ये नोकऱ्या

संजीवनीच्या सहा अभियंत्यांना सॅप कोर्समुळे एक्सपावुंड टेक्निवो व झेन्सर टेक्नॉलॉजिज मध्ये नोकऱ्या


  सॅप कोर्स ठरतोय विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि २३ एप्रिल २०२५: कोणत्याही शाखेच्या इंजिनिअरींगची पदवी असली आणि त्यात आधुनिक कंपन्यांच्या नविन तंत्रज्ञानानुसार एखादा अधिकचा अल्प कालावधीचा कोर्स केलेला असला तर चांगल्या पगाराची नोकरी मिळणे सोपे होते. हा निष्कर्ष  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने काढला आणि त्यानुसार संजीवनीने सॅप (सिस्टिम्स, अॅप्लिकेशनस् अँड  प्रॉडक्टस् ईन डेटा प्रोसेसिंग) या बहुराष्ट्रीय  सॉफ्टवेअर कंपनीशी  सामंजस्य करार केला आणि सॅपचे  प्रशिक्षण  आपल्या विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण  घेत असतानाच दिले. या कोर्समुळे एका पाठोपाठ एक कंपनी नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत आहे. अलिकडेच एक्सपावुंड टेक्निवो व झेन्सर टेक्नॉलॉजिज या कंपन्यांनी संजीवनीच्या एकुण सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. अशा  प्रकारे सॅपचा कोर्स विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत आहे, अशी  माहिती महाविद्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

             पत्रकात पुढे म्हटले आहे की एक्सपावुंड टेक्निवो या सॅप तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या  कंपनीने अंतिम वर्षातील  मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या वैभव बंडू फेपाळे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वरद सुदाम साबने, ओम ऋषिकेश  सिध्दा व रोहित दत्तात्रय बुळे यांची निवड केली आहे. झेन्सर टेक्नॉलॉजिज या सॉफ्टवेअर आणि सेवा कंपनीने कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या गौरी बाबासाहेब चांदर व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगच्या ऋतिका आण्णासाहेब जाधव यांची निवड केली आहे.

जाहिरात

         आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळावी या विष्वासाने पालक आपल्या पाल्यांना संजीवनीमध्ये शिक्षणासाठी  दाखल करतात. पालकांचा विश्वास सार्थ करण्यासाठी संजीवनीचे प्राद्यापक वेगवेगळे उपक्रम राबवितात. यामध्ये नियमित अभ्यासक्रमाबरोबरच जापनीज, कोरियन व जर्मन भाषांचे प्रशिक्षण , मुलाखतींचा सराव, कंपनी निहाय अधिकचे प्रशिक्षण , नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे, उद्योग जगतातील तज्ञ व्यक्तिंची मार्गदर्शनपर भाषणे , व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम, इत्यादींचा समावेश  असतो. अशा  या संजीवनी पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांची साथ असेल तर ते हमखास यशस्वी होतात. या सर्व प्रयत्नांमुळे संजीवनीच्या माध्यमातुन दरवर्षी  एक हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये नोकऱ्या  मिळत आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.तर संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व नवोदित अभियंते व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे