गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते
गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते
गोदरेज पशू आहार गणेशोत्सव प्रश्नमंजुषेत आसने विजेते
कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२५ –
गोदरेज पशू आहार यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त राज्यभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दि २७ ऑगस्ट २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दररोज एक भाग्यवान विजेता निवडला गेला.

या विशेष उपक्रमात कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्रगतशील दुग्ध उत्पादक मा. भागिनाथ बाबासाहेब आसने यांची भाग्यवान विजेता म्हणून निवड झाली.
बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी बक्षीस वितरण कंपनीचे प्रतिनिधी ओंकार डांगे आणि कोपरगाव येथील अधिकृत विक्रेते थोरे अँड सन्स यांच्या हस्ते त्यांना गोदरेज धनलक्ष्मी पशु आहार बॅग प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याची संधी मिळाली. आसने यांचा सन्मान हा परिसरातील दुग्ध व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





