आपला जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार स्वागत स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार स्वागत स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार स्वागत स्वागत

जाहिरात

अहिल्यानगर विजय कापसे दि २२ डिसेंबर २०२४राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

जाहिरात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

जाहिरात

यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी त्यांचे स्वागत केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे