आपला जिल्हा

राजकीय हस्तक्षेपामुळे सरळ असलेला संगमनेरचा रेल्वे मार्ग बदलला- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

राजकीय हस्तक्षेपामुळे सरळ असलेला संगमनेरचा रेल्वे मार्ग बदलला- माजी मंत्री बाळासाहेब थोरात

तालुक्यातील वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त

Sangmner vijay kapse दि १९ मे २०२६चाळीस वर्षे सातत्याने काम करून तालुका विकास कामांमधून उभा केला. पठार भागासाठी मुळा नदीवर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण केले. गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्याला वरदान ठरणारी नाशिक पुणे रेल्वे ही साकुर मार्गे सरळ जाणार होती. मात्र ज्यांना तालुक्याचा विकास पहावत नाही अशा लोकांनी राजकीय हेतू ठेवून तालुक्याची रेल्वे पळवली असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून तालुक्यात वाढत झालेली हप्तेखोरी व टक्केवारी हा अत्यंत हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे

जाहिरात

साकुर येथील विरभद्र लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले, सभापती शंकरराव खेमनर, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. सुशील कपिल, डॉ. समाधान सुरवसे , इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, रामदास धुळगंड, सौ मीराताई शेटे, कारखान्याचे संचालक नवनाथ आरगडे ,रामनाथ कुटे ,अंकुश ताजने, सतीश वर्पे ,दिलीप नागरे , मदन आंब्रे ,गुलाबराव देशमुख , विलास शिंदे, विजय राहणे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,दादा पाटील आहेर, मारुती केदार, तुकाराम दातीर, माधव दातीर, अदिक खेमनर ,बापू जाधव, बाळासाहेब सागर ,सुरेश गाडेकर, सौ साकुरे, उत्तम बुरके ,जयराम ढेरंगे, कृष्णा दिघे कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सहकार्यातून मुळा नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्याचे काम आपण केले. प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्याचा लौकिक राज्यभरात वाढवला. तालुक्यात विविध रस्त्यांची कामे मार्गी लावली. 2024 मध्ये अनेक रस्ते मंजूर केले. मात्र सत्तेवर आलेल्या लोकांनी रस्त्यांची कामे रद्द केली. तालुक्यासह या भागाला वरदान ठरणारी नाशिक पुणे रेल्वे साकुर हा मार्ग निवडला हा अत्यंत सोयीचा आणि सरळ मार्ग होता. रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण करून सुमारे पाचशे कोटी शेतकऱ्यांना दिले गेले त्यावेळेस जीएमआरटीचे कोणतेही कारण नव्हते.

जाहिरात

मात्र ज्यांना तालुक्याचा विकास पाहावत नाही अशा मंडळींनी राजकीय हस्तक्षेपातून रेल्वे मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. आता तर या हायस्पीड रेल्वे ऐवजी गुजरातला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या विभागाच्या कृषी, शिक्षण, रोजगारसाठी संगमनेर सरळ रेल्वे मार्गे गरजेचे असून यासाठी आपला पाठपुरावा राहणार आहे. ज्यांनी रस्त्यांची कामे रद्द केली. ते आता कामाबाबत बोलत आहे. तालुक्यात वाढलेली हप्तेखोरी आणि टक्केवारी हा अत्यंत चिंतेचा विषय असल्याचे ते म्हणाले

जाहिरात

संगमनेर तालुक्यातील सहकारी संस्था या अत्यंत चांगल्या सुरू आहेत साखर कारखान्या कार्यक्षेत्रात 15 लाख मेट्रिक टनाचे उत्पादन निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवताना प्रत्येक शेतकऱ्याने एकरी 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी दिले

शास्त्रज्ञ डॉ कपिल सुशील म्हणाले की ,उत्पादकता वाढीसाठी ऊस बेणे बदल करणे गरजेचे आहे. सीओ 265 ची उत्पादकता कमी झाली त्यावर 86032 हा चांगला पर्याय असून याला फुटवे जास्त असतात व चांगला खोडवा येतो. कमी कालावधीत हा ऊस येत असून उसाच्या विविध जातींबद्दल त्यांनी माहिती दिली. तर डॉ समाधान सुरवसे यांनी मातीचे आरोग्य खराब झाले तर उत्पादकता कमी होत असून पाण्याचा अतिवापर व जास्त खतांच्या वापराने जमीन खराब होते असे सांगताना ऊस लागवड ही दक्षिण उत्तर करावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले .यावेळी साकुर परिसरातील शेतकरी नागरिक महिला युवक व ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खरशिंदे येथील 65 वर्षीय आजीचा गौरव

खरशिंदे येथील 65 वर्षीय गंगुबाई शिवराम गायकवाड या महिलेने घरात घुसलेल्या बिबट्याला जेरबंद केले त्यांच्या धाडसाने मोठे संकट टळले असून या ज्येष्ठ आजीचा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सत्कार करून अभिनंदन केले यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे