माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाविकांसमवेत खंडोबारायाची भरली तळी
विविध विकास कामांचे उद्घाटन; आपल्याला विकास कामांची परंपरा कायम ठेवायची आहे – माजी मंत्री थोरात
वरवंडी येथील स्थापलिंग खंडोबा येथे भव्य काठी मिरवणूक काढण्यात आली यावेळी हायमास्ट सह विविध विकास कामांचा शुभारंभही करण्यात आला .याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, जि प माजी सदस्या मीराताई शेटे, जयराम ढेरंगे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक युवक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खंडोबा रायाच्या काठी मिरवणूकत सहभागी घेतला तसेच सर्वांची आराध्य दैवत असलेल्या स्थापलिंग खंडोबाची आरती करून तळी भरली.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले की संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे विविध धार्मिक स्थळांसाठी आपण सातत्याने पर्यटन विकास अंतर्गत मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. खंडेश्वर, रामेश्वर, निजरनेश्वर, दुधेश्वर, देवगड,याचबरोबर पठार भागातील साकुर मधील विविध गावांसह वरवंडी गावाच्या देवस्थानसाठीही निधी दिला आहे. सातत्यपूर्ण कामांमुळे गावागावात विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत आपल्या गावातील सर्वांमधील मतभेद दूर करून सर्वांनी एकत्र यायचे आहे. तालुक्याच्या चांगल्या राजकारणाची व विकासाची परंपरा आपल्याला सुरू ठेवायची आहे.
तर शंकर पाटील खेमनर म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पठार भागावर प्रेम केले असून अनेक विकासाच्या योजना राबवले आहेत. सरकार कोणाचेही असो तालुक्यातील सर्वसामान्य जनते करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेच सरकार असल्याचे ते म्हणाले. तर सौ.मीराताई शेटे म्हणाल्या की,वरवंडी ते स्थापनिंग देवस्थान या रस्त्या करता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा परिषद योजनेतून निधी मंजूर करून दिला याचे कामही सुरू आहे याचबरोबर या देवस्थानच्या मंदिरासाठी स्वखर्चातून कमाल दिली आहे यामुळे या पर्यटन क्षेत्राच्या वैभवात भर पडली असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी तरुणांनी काठी मिरवणुकीमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी वरवंडीसह पंचक्रोशीतील नागरिक युवक जेष्ठ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.