नारंदी ऍग्रोचे भाऊसाहेब वाघ यांचे निमगाव खैरी व देर्डे चांदवड गावातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन
नारंदी ऍग्रोचे भाऊसाहेब वाघ यांचे निमगाव खैरी व देर्डे चांदवड गावातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन
नारंदी ऍग्रोचे भाऊसाहेब वाघ यांचे निमगाव खैरी व देर्डे चांदवड गावातील बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

कोपरगाव विजय कापसे दि ९ जानेवारी २०२५– कोपरगाव तालुक्यातील प्रसिध्द उद्योजक नारंदी ऍग्रो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी व कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावा करिता घरगुती व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन केले.

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे जिल्हा उद्योग केंद्र एम.सी.इ.डी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून महिलांचा उद्योगाला नवीन भांडवल पुरवणे उद्योगासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करणे उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण करणे आदी विषयावर कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील नारंदी ऍग्रो फार्म कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व एम.सी.इ. डीचे जिल्हा समन्वयक भाऊसाहेब वाघ यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय करावे व मार्केटिंग बाबत पण येणाऱ्या अडचणी बाबत सुध्दा माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी बी.एम.एम शेरे सर व गावचे सरपंच यांनी सुध्दा उपस्थित राहुन महिलांना मार्गदर्शन केले.तसेच ग्रामसंघाचे पदाधिकारी व सी.आर.पी संगिता काळे उपस्थित होते.

तर कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जवनोन्नती अभियान पंचायत सामिती कोपरगाव अंतर्गत स्थापन सर्व महिला बचत गटाच्या सदस्यांना जिल्हा उद्योग केंद्र एम.सी.इ.डी व कौशल्या ऍग्रो महीला शेतकरी उत्पादक कंपनी तसेच आनंदी महिला प्रभागसंघ यांच्या माध्यमातून महिलांचा उद्योगाला नवीन भांडवल पुरवणे उद्योगासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करणे उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ निर्माण करणे आदी विषयावर कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील नारंदी ऍग्रो फार्मर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व एम.सी.इ.डीचे जिल्हा समन्वयक भाऊसाहेब वाघ यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.




