वडगावपान मध्ये ३०० महिलांच्या उपस्थितीत भव्य हळदीकुंकूवाचा कार्यक्रम संपन्न
वडगावपान मध्ये ३०० महिलांच्या उपस्थितीत भव्य हळदीकुंकूवाचा कार्यक्रम संपन्न
हळदी कुंकू कार्यक्रमामुळे महिलांना व्यासपीठ – दुर्गाताई तांबे
तळेगाव दिघे विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५–सध्या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठे योगदान दिले असून महिला सबलीकरणासाठी हळदीकुंकवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या महिलांना हे मोठे व्यासपीठ ठरत असल्याचे गौरवोद्गार सौ दुर्गाताई तांबे यांनी काढले असून वडगाव पान मध्ये 300 महिलांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या हळदीकुंकवा सह विविध खेळांच्या कार्यक्रमांनी धमाल केली.
वडगाव पान येथे महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू व पैठणीचा खेळ संपन्न झाला यावेळी सौ दुर्गाताई तांबे कृषी भूषण सौ प्रभावतीताई घोगरे, डॉ.भावना गाढवे, सौ रुपाली थोरात, सौ पद्माताई थोरात, सविता थोरात, सोनाली थोरात, सविता कुळधरण, मोहिनी थोरात, आशाताई थोरात ,रूपाली गुंजाळ, वंदना थोरात, ज्योती मोरे ,मनीषा थोरात, वर्षा थोरात, कविता ओहोळ, शालिनी थोरात, भाग्यश्री थोरात यांचे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सर्व महिलांनी एकमेकींना तिळगुळ देत एकत्र राहून चांगले वागणे बोलण्याचा संदेश दिला. यावेळी पैठणी याचबरोबर संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या, सामूहिक नृत्य वेशभूषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महिलांनी सर्व क्षेत्रांमध्ये घेतलेली भरारीही अत्यंत कौतुकास्पद आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये अजूनही महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुटुंब सांभाळणारी जर निरोगी असेल तर ते कुटुंब निरोगी राहील. मात्र महिलांमध्ये आजार लपवण्याचे प्रमाण जास्त असून आता महिलांनी धाडस करून स्वतःच्या आजाराबाबत तरी कुटुंबीयांशी बोलले पाहिजे.चांगला आहार घेऊन निरोगी राहिले पाहिजे. महिला सबली करण्यासाठी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध उपक्रम तालुक्यात राबवले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
तर सौ प्रभावती घोगरे म्हणाल्या की, शेतीकडे व्यवसाय म्हणून जर पाहिले तर नक्कीच घराला मोठा आर्थिक हातभार लागतो. व्यवसायामध्ये जसे आपण नफा तोटा पाहतो तसाच शेतीमध्येही पाहिला पाहिजे परंतु अनेक महिला शेती असूनही त्याबाबत उदासीन असतात नवी ऊर्जा घेऊन शेतीमध्ये काम केल्यास नक्कीच तुम्ही स्वतः उद्योजक असल्यासारखे तुम्हाला वाटेल असे त्या म्हणाल्या तर डॉ भावना गाढवे म्हणाल्या की, लोक चंद्रावर गेले मात्र आपल्या महिला अजूनही आजार लपवता आहेत. स्वच्छता व आहार हे कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची असून या दोन्ही गोष्टी महिला करत असतात. चांगला आहार घ्या, आरोग्याबाबत हळदी कुंकू कार्यक्रम किंवा बचत गटाच्या माध्यमातून सतत चर्चा करा असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली थोरात यांनी केले तर कविता ओहोळ यांनी आभार मानले याप्रसंगी विजेत्या महिलांना पैठणी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.