ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहाता तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहाता तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा
ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहाता तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा
राहाता विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५– गोदावरी आणि कृष्णा खोरे दुष्काळ मुक्त करुन या लाभक्षेत्रातील सिंचन क्षमता वाढविण्याला आपले प्राधान्य असून, गोदावरी कालव्यांचे नुतनीकरन करुन, कालव्यांची वहन क्षमता वाढविणे आणि निळवंडेच्या लाभक्षेत्रात वितरीकांची कामे तातडीने सुरु करण्याचे काम करुन, शेवटच्या शेतक-याला पाणी मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न असतील अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्याच्या वतीने ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन विरभद्र मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. जेष्ठनेते माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहळ्यात आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ यांचाही सन्मान करण्यात आला. ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक, गुरुवर्य परमानंद महाराज, गुरुवर्य कृष्णनाथ बाबा लाड, महंत रमेशगिरीजी महाराज यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यापुर्वी ना.विखे पाटील यांची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सामान्य माणसाचे आशिर्वादरुपी पाठबळ पाठीशी राहील्यामुळेच मोठ्या मताधिक्याने आठव्यांदा विजयी होता आले. राज्यातही महायुतीला एैतिहासिक यश मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महायुतीची सत्ता राज्यात येवू शकली. मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सर्व समाज घटकांसाठी योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळेच सर्वसमाज घटकांचे पाठबळ महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे राहीले. महायुतीच्या एैतिहासिक विजयात सर्व समाज घटकांचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.
लोकसभा निवडणूकीत खोटे नॅरेटीव्ह पसरवून जनतेची दिशाभूल केली गेली. संविधान बदलण्याच्या खोट्या अफवा पसरविल्या गेल्या. परंतू या देशातील जनतेने तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसण्याची संधी दिला. राज्य घटनेचा सन्मान भाजप सरकारच्या काळातच मोठ्या प्रमाणात झाला. लोकसभा निवडणूकीत तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रत्येक महिलेच्या खात्यात साडेसात हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्यातील एक दमडीही आज मिळालेली नाही. महायुती सरकारने मात्र सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचे अनुदान २१०० रुपये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्याने स्व.डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याची मोठी संधी मिळाली आहे. पश्चिम वाहीनी नंद्याचे पाणी तुटीच्या खो-यात वळवून गोदावरी आणि कृष्णा खोरे दुष्काळमुक्त करतानाच या लाभक्षेत्रातील सिंचन क्षमता वाढविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्याची सुरुवातही झाली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, गोदावरी कालव्यांच्या नुतणीकरणाचे काम सुरु करुन, त्याची वहनक्षमता वाढविणे तसेच निळवंडे कालव्यांच्या वितरीकांच्या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना विभागाच्या आधिका-यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्याला पराभूत करण्यासाठी जाणते राजे मुक्कामाला येवून थांबले, स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणून घेणारे सुध्दा इकडेच वेळ घालवत बसले. पण त्यांच्या प्रयत्नांना सुज्ञ जनतेने साथ दिली नाही. त्यांनी केलेल्या निंदा नालस्तीच्या भाषणापेक्षा या भागातील जनतेने विकासाच्या आणि विचारांच्या मागे उभे राहणे पसंत केले. मागील पस्तीस वर्षात मतदार संघातील विकास कामांवरच विश्वास ठेवून विरोधकांना चपराक दिली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
शिर्डी परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे उद्योग आणण्याच्या कामालाही चालना मिळाली असून, शिर्डी येथील थिमपार्क, विमानतळाच्या इमारतीचे विस्तारीकरण तसेच सर्व सुविधांनी परिपुर्ण असे क्रिडा संकुल उभारण्याचा संकल्प आपला असून, याचे काम तातडीने सुरु करायचे आहे. नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक पुर्ण करण्यासाठीही केंद्र आणि राज्य सरकार कडून निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील यांच्या कार्याचा आढावा घेवून लोकसभा निवडूकीत पराभवाने अनेक वेगवेगळ्या अफवा विरोधकांकडून जाणीवपुर्वक पसरविल्या गेल्या. परंतू या भागातील जनतेने विकास कामांना साथ दिली. या भागात जो विचार जोपासला गेला, त्याला पाठबळ दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मंत्री विखे पाटील यांनी मागील अडीच वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात जी विकासाची प्रक्रीया आणि योजनांची अंमलबजावणी करुन दाखविली त्याला जनतेने साथ दिली. दहा आमदार या जिल्ह्यातून निवडून जाण्यामध्ये ना.विखे पाटील यांचे योगदान खुप मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात या भागात येवून स्वत:ला भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणा-यांचा संगमनेर तालुक्यातील जनतेने कसा पराभव केला, असे सांगताना ही किमया फक्त विखे पाटील यांच्यामुळे होवू शकली. राहाता तालुक्या प्रमाणेच संगमनेरच्या विकास प्रक्रीयेलाही ना.विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करुन दिला त्यामुळेच तालुक्यात परिवर्तन होवू शकले. माझ्या सारख्या एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेत जावू शकला, ही जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात एैतिहासिक घटना ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.