कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २१ जानेवारी २०२५– आखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे.
जाहिरात
संबंध भारतभरातील केमिस्ट बांधवांचे श्रद्धास्थान असलेले जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त एका दिवसात ७५ हजार रक्त पिशव्या संकलन करण्याचा विश्वविक्रम करण्याचा मानस समस्त केमिस्ट बांधवांनी हाती घेतला असून त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील केमिस्ट बांधवांनी देखील एकत्र येत शुक्रवार दि २४ जानेवारी रोजी कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जाहिरात आत्मा
कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव शहरातील बस स्टँड समोरील व्यापारी धर्मशाळेमध्ये, कोळपेवाडी येथील डॉ कोळपे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज व कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज मध्ये सकाळी ९ ते ६ या वेळेत महारक्तदान शिबिर आयोजित केले असून तरी जास्तीत जास्त दात्यांनी या शिबिरात सहभागी होत देश हिताचे कार्य समजून रक्तदान करावे असे आवाहन कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.जाहिरात