जगन्नाथ घुगरकर यांना सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर; थोरात कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
जगन्नाथ घुगरकर यांना सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर; थोरात कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
संगमनेर विजय कापसे दि २२ जानेवारी २०२५–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना वसंत दादा इन्स्टिट्यूट पुणे यांनी सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी मार्गदर्शन करणारी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ही मध्यवर्ती संस्था असून या संस्थेने 2023-24 मधील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दलचे विविध पुरस्कार जाहीर केले आहे . सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम सभासद ऊस उत्पादक कर्मचारी यांचे हित जोपासताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले तालुक्याच्या ग्रामीण विकासात कारखान्याचे मोठे योगदान असून हा कारखाना संपूर्ण देशातील सहकारी कारखान्यासाठी दीपस्तंभ ठरला आहे .
कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी अत्यंत कार्यक्षमपणे काम करताना व्यवस्थापन, कामगार, सभासद या सर्वांना बरोबर घेऊन विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना यापूर्वी ही सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक तसेच इंडस्ट्री एक्सलंट अवार्ड मिळालेले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, ॲड माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे ,हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, व्हाईस चेअरमन संतोष हासे, कारखान्याची सर्व संचालक, सभासद व अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार सामूहिक कामाचा –घुगरकर
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या काटकसर, पारदर्शकता व आर्थिक शिस्त या आदर्श तत्त्वावर कारखान्याची वाटचाल सुरू असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने उच्चांकी गाळप करताना शेतकरी सभासद ऊस उत्पादन कामगार यांचे हित जोपासले आहे. हा मिळालेला पुरस्कार सामूहिक कामाचा असून यापुढील काळात काम करण्यासाठी आणखी ऊर्जा देईल अशी भावना कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी व्यक्त केली आहे