विखे-पाटील

मंत्री विखे पाटील उद्या ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ पुरस्‍काराने होणार सन्‍मानित

मंत्री विखे पाटील  उद्या ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ पुरस्‍काराने होणार सन्‍मानित

मंत्री विखे पाटील  उद्या ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ पुरस्‍काराने होणार सन्‍मानित

लोणी विजय कापसे दि.२२ जानेवारी २०२५–  केंद्रीय रस्‍तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा कडून ‘डॉक्‍टर ऑफ सायन्‍स’ ही मानाची पदवी देवून गुरुवारी सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

जाहिरात

       वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या २६ वा पदवीदान समारंभ गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी संपन्‍न होत असून, राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी राधाकृष्‍णन्, कृषि राज्‍यमंत्री आशिष जयस्‍वाल, राज्‍यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर, भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेचे संचालक डॉ.व्‍ही.के तिवारी, कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे तुषार पवार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्र मणी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना डॉक्‍टर ऑफ सायन्‍स देवून सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

जाहिरात

       मंत्री विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्रात केलेल्‍या   उल्‍लेखनिय कार्याची दखल घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने त्‍यांना डॉक्‍टर ऑफ सायन्‍स या पदवीने सन्‍मानित करण्‍याचा निर्णय घेतला. यापुर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्री विखे पाटील यांना जीवन गौरव पुरस्‍काराने आणि राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाने डॉक्‍टर ऑफ सायन्‍स पदवी देवून सन्‍मानित केले होते.

जाहिरात

       ना.विखे पाटील यांनी आपल्‍या राजकीय, सामाजिक वाटचालीत अनेक महत्‍वपूर्ण पदांवर काम करुन, सामाजिक हिताचे निर्णय घेतले. या मध्‍ये प्राध्‍यान्‍याने कृषि व पणन मंत्री असताना शेतकरी हिताच्‍या  निर्णयांमुळे कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळाली. शेतकरी ते ग्राहक ही योजना पहिल्‍यांदा राज्‍यात सुरु करुन शेतक-यांच्‍या उत्‍पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळवून देण्‍याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला. शेतकरी गट आणि फार्मर्स प्रोड्युसर कंपन्‍यांना त्‍यांनी मंत्रीपदाच्‍या माध्‍यमातून प्रोत्‍साहन दिले होते.

जाहिरात आत्मा

       पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा सहकार चळवळीचा वारसा त्‍यांनी पुढे घेवून जातानाच सहकारी साखर कारखानदारी, सहकारी बॅकींग क्षेत्र आणि सहकारी पतसंस्‍था चळवळीलाही त्‍यांनी पाठबळ देत सहकार क्षेत्रामध्‍ये मोठे योगदान दिले आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध करुन देतानाच कौशल्‍य  शिक्षणालाही त्‍यांनी मोठे प्राधान्‍य दिले आहे.

जाहिरात

       मुख्‍यमंत्री कौशल्‍य प्रशिक्षण योजना तसेच आचार्य चाणक्‍य कौशल्‍य  प्रशिक्षण योजनेची सुरुवात त्‍यांनी प्रवरेच्‍या शिक्षण संस्‍थेतून सुरु केली. ३५ प्रकारचे विविध कोर्सेस सुरु करुन, ग्रामीण भागातील युवकांना संधी निर्माण करुन दिली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्‍यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्‍यांच्‍या नोकरीसाठी स्‍वतंत्र प्‍लेसमेंट सुविधा उपलब्ध करुन दिल्‍याने हजारो विद्यार्थी आज नामवंत कंपन्‍यांमध्‍ये  नोकरीसाठी पात्र ठरले आहेत. मोफत स्‍पर्धा परिक्षा केंद्र व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरु करुन, विद्यार्थ्‍यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्‍याची भूमिका त्‍यांनी कायम ठेवली आहे.

       विखे पाटील परिवाराचे सामाजिक योगदानही मोठे असून, आरोग्‍य  क्षेत्रामध्‍ये पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, प्रवरा मेडीकल ट्रस्‍ट या माध्‍यमातून समाजासाठी आरोग्‍याच्‍या सुविधाही त्‍यांनी निर्माण केल्‍या. जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून महिला बचत गटांची चळवळ सुरु करुन, ग्रामीण भागातील महिलांना स्‍वयं रोजगाराच्‍या संधी आणि लखपती दिदि योजनेतून अर्थसहाय्य करण्‍यासाठी मंत्री विखे पाटील यांचा चांगला पुढाकार राहीला आहे.

       मंत्री विखे पाटील यांच्‍या सामाजिक कार्याचा गौरव म्‍ह‍णून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने डॉक्‍टर ऑफ सायन्‍स ही पदवी देवून सन्मान केल्‍याबद्दल त्‍यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे