महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण ही काळाची गरज- विवेक कोल्हे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण ही काळाची गरज- विवेक कोल्हे
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १४ एप्रिल २०२६–भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी भारतीयांना सर्वधर्मसमभावाचा अधिकार दिल्यामुळे देशात शांतता, सलोखा आणि प्रगतीचा मार्ग कायम राहिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे कृतीतून आचरण करणे आवश्यक आहे,ती काळाची गरज आहे असे प्रतिपादन युवानेते विवेक कोल्हे यांनी केले आहे.
जाहिरात
कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.या प्रसंगी सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नूतन इमारतीत कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने १० तासांचे स्टडी मॅरेथॉन सत्र आणि भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.जाहिरात
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवानेते विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आणि शिक्षण सभापती संजनाताई संजय उदावंत यांच्या हस्ते पार पडले.यावेळी जि.प. प्राथमिक शाळा, मुर्शतपूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते भारतीय संविधान हस्तलिखित प्रत लेखन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.ग्रंथ प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.