आपला जिल्हा

संवत्सर येथे अंगणवाडी पालकांचा आरंभ पालक मेळावा संपन्न

संवत्सर येथे अंगणवाडी पालकांचा आरंभ पालक मेळावा संपन्न
संवत्सर येथे अंगणवाडी पालकांचा आरंभ पालक मेळावा संपन्न
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २३ जानेवारी २०२५एकात्मिक बालविकास प्रकल्प यांचे अंतर्गत संवत्सर येथे मंगळवार दि २१ जानेवारी रोजी अंगणवाडी पालकांचा आरंभ पालक मेळावा सरपंच सुलोचना दिलीपराव ढेपले यांचे अध्यक्षतेखाली तर उपसरपंच विवेक परजणे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाधिकारी रूपाली धुमाळ , पर्यवेक्षिका  खोले मॅडम, माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले आदींसह संवत्सर कोकमठाण डाऊच जेऊर कुंभारी या गावातील अंगणवाडी सेविका मदतनिस तसेच गावातील महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी ताईंनी बनवलेल्या विद्यार्थी अंतर्गत स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले तर माजी केंद्रप्रमुख दिलीपराव ढेपले यांनी बोलताना सांगितले की, भावी देशाचे नागरिक बनवण्याचं काम अंगणवाडी पासून सुरू होतं आई-वडिलांनंतर त्यांचं सर्वच  जबाबदारी अंगणवाडी ताई या घेत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या, बौद्धिकतेच्या, पौष्टिक आहार, खेळ आदी सह महत्वाच्या अंगाचा विकास होत असतो त्याचबरोबर संवत्सर गटातील अंगणवाडीसाठी माजी जिल्हापरिषद सदस्य राजेश परजणे यांचे देखील मार्गदर्शन लाभत असतं त्यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्या अंगणवाडीचे काम चांगले असल्याचे सांगत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
महिला बाल कल्याण अधिकारी रुपाली धुमाळ यांनी शासनातर्फे अनेक योजना राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती देत गरोदर महिलांच्या संदर्भात आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे काय केले पाहिजे याचे याचे मार्गदर्शन केले तर या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक खोले मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अश्विनी तिरमखे यांनी व्यक केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे