आपला जिल्हाकोल्हे गट

मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे कोल्हे यांची मागणी

 मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करण्याची मुख्यमंत्री यांच्या कडे कोल्हे यांची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे माजी आमदार कोल्हे यांनी केली मागणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२५कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी गेले काही वर्षात दरोडा आणि जबरी चोरी सारख्या घटना घडल्या आहेत.यामागे मुख्यतः पोलिस दूरक्षेत्रात नियुक्ती असलेले पोलिस उपस्थिती नसल्याने चोर त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे कोपरगाव मतदारसंघातील पोलिस दुरक्षेत्र तातडीने कार्यान्वित करा अशी मागणी मा. आ.सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जाहिरात

कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन अंकित कोळपेवाडी दुरक्षेत्र आणि वारी पोलिस दूरक्षेत्र,शिर्डी पो.अंकित पोहेगाव दुरक्षेत्र, राहता पो.अंकित पुणतांबा दुरक्षेत्र,श्रीरामपूर तालुका पो.अंकित चितळी दुरक्षेत्र कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.थेट तालुका स्तरावरून पोलिस पाचारण होऊ पर्यंत घटना स्थळावरून गुन्हेगार पलायन करण्यात अनेकदा यशस्वी होतात त्यामुळे वरील मंजूर असणारे दूरक्षेत्रे कार्यान्वित झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

जाहिरात आत्मा

कोळपेवाडी येथे सन २०१८ मध्ये सुवर्णकार दुकानावर दरोडा पडून व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता त्याच प्रकारे नुकतेच पोहेगाव येथे २१ जानेवारी२०२५ रोजी दिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत असणाऱ्या सुवर्णकार दुकानावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा पडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरोडे, घरफोड्या,चोऱ्या यांना आळा घालण्यासाठी मतदारसंघातील मंजूर असणारे पोलिस दुरक्षेत्र कार्यान्वित करावे अशी मागणी कोल्हे यांनी नामदार फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात

पोलिस हा समाज व्यवस्थेला सुरळीत आणि भयमुक्त राहण्यासाठी मदत होणारा महत्वाचा घटक आहेत त्यांना दूरक्षेत्रात दिलेली जबाबदारीचे नेटके नियोजन होऊन ही दुरक्षेत्रे कार्यान्वित होणे हा महत्वाचा भाग कायदा आणि सुव्यवस्था जतन करण्यास ठरणार आहे.तरीही या प्रश्नावर नामदार फडणवीस साहेब लक्ष घालून लवकरच तोडगा निघेल असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 पोहेगाव येथील घटना घडताच विवेक कोल्हे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्याशी घटनेबद्दल दूरध्वनीवरून माहिती देऊन चर्चा करत आरोपींना कठोर शासन होण्यासाठी मागणी केली होती.तसेच या घटनेवेळी नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा बाका प्रसंग टळला असून लवकरच दुरक्षेत्रे कार्यान्वित झाल्यास भविष्यात नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा अधिक धाक गुन्हेगारांवर बसण्यास मदत होईल.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे