आपला जिल्हा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन-भरत मोरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन-भरत मोरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन-भरत मोरे
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि २९ जानेवारी २०२५ :- कोपरगाव शहरातील प्रसिद्ध हत्ती गणपती कोपरगाव आणि कालांश राजगिरा लाडू  यांच्या वतीने आयोजित आयोजित हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य महाराष्ट्र राज्य निबंध स्पर्धेचे आयोजन २३ जानेवारी २०२५  ते ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करण्यात आले असून  “एक दिवस मोबाईल शिवाय” या विषयावर निंबध पाठवावे असे आवाहन कोपरगाव येथील हत्ती गणपतीचे संस्थापक तथा माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांनी केले आहे.

जाहिरात
कोपरगाव येथील हत्ती गणपती आणि कालांश राजगिरा लाडू यांच्या वतीने या निंबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन ही  स्पर्धा वयोगट  वय वर्ष ६ ते १८ आणि खुला गट अशी असणार आहे. निबंधाची भाषा माध्यम मराठी असावे आणि सुंदर अक्षर व शुद्धलेखन नीटनेटकेपणा असावा. एका घरातून कितीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकता पण निबंध त्याने स्वतः लिहिलेला असावा तसेच लिहलेला निबंध जपून ठेवावा वेळप्रसंगी ते जमा करावे लागेल. निबंध इंटरनेट वरील कॉपी नसावा निबंधाच्या उजव्या बाजूला स्पर्धकाचे नाव, जन्म तारीख, पत्ता, शाळा अथवा व्यवसाय, मोबाईल नंबर आदी माहिती स्पष्टपणे लिहणे आवश्यक आहे.

जाहिरात
कोपरगाव शहर आणि तालुक्यातील स्पर्धकांनी बस स्थानकासमोरील प्रगती मेडिकल आणि प्रगती ऑप्टिकल मध्ये दिलेल्या वेळेत आपले निंबध जमा करावेत. तसेच कोपरगाव तालुक्या बाहेरील स्पर्धकांनी ९५५२२२५५२८ व ९६६९९३९५५५ या व्हाट्सएप नंबर वर आपले निबंध पीडीएफ फाईल द्वारे पाठवावे. स्पर्धा हि सर्वासाठी विनामुल्य असल्याने या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हत्ती गणपती कोपरगाव मंडळाचे संस्थापक तथा माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे, कालांश उद्योग समूहाचे रोहित काले, जय महाकाल मित्र मंडळाचे गगन हाडा, नवश्या गणपती मंडळाचे बालाजी गोर्डे,भगवे राजे मित्र मंडळाचे अमोल शेलार यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे