आपला जिल्हा
बक्तरपुर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक सानप
बक्तरपुर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक सानप
बक्तरपुर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक सानप
कोपरगाव विजय कापसे दि २९ जानेवारी २०२५
कोपरगाव तालुक्यातील बक्तरपुर येथे सरपंच मुक्ताबाई नागरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपसरपंच कमलाबाई सानप, ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील भारत सानप यासह समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अशोक सानप यांची निवड करण्यात आली आहे.
नाना सानप यांनी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची सूचना मांडली तर त्यास एकनाथ सानप यांनी अनुमोदन दिले. सर्व ग्रामस्थांच्या एकमताने तंटामुक्ती अध्यक्षांची निवड पदी अशोक सानप यांची एकमताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या वेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ग्रामस्थांनी अशोक सानप यांच्या मागील कामाची कारकीर्द तसेच कामाचा अनुभव तसेच काम करण्याची पद्धत यांची प्रशंसा केली त्यांच्या कामामुळे प्रभावित होऊन सर्व गावकऱ्यांनी एकमतांनी त्यांचे नाव सुचवले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी गावातील ज्येष्ठ मंडळी सोमनाथ सानप, विशाल सानप, अरुण डोंगरे, नानासाहेब सानप, साहेबराव सानप, गणेश सानप, गोवर्धन सानप, अशोकराव नागरे, शरदराव गरुड, दिलीप गरुड, माधव गरुड, रमेश गरुड, आनंदा सानप वर्षा नागरे, शिवाजी सानप, काळू नागरे, रावबा सानप यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश नागरे यांनी केले.