आपला जिल्हा

शिर्डीत ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर- भाऊसाहेब वाघ

शिर्डीत ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर- भाऊसाहेब वाघ

शिर्डीत ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर- भाऊसाहेब वाघ

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १९ फेब्रुवारी २०२५जगप्रसिद्ध शिर्डी या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचे येत्या २६ व २७ फेब्रुवारी रोजी भव्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना राज्य ग्रंथ सेलचे राज्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

या पत्रकात भाऊसाहेब वाघ यांनी म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण या संकल्पनेतून शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे विधायक उपक्रम राबवत असते याच धर्तीवर शिवसेना ग्रंथालय सेलची स्थापना बी.जी देशमुख यांनी केली असून आज ग्रंथालय सेल अतिशय उत्कृष्टपणे ग्रंथालय चालकांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वेगवेगळ्या मागण्या अडीअडचणी दूर करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहे.

जाहिरात

तर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे गेल्या काही काळापासून ग्रंथालय चालकांच्या  मागण्यांकडे स्वतः कटाक्षाने लक्ष देत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते राज्याचे मुख्यमंत्री असताना ग्रंथालय चळवळीला ६० टक्के अनुदान वाढ झाली तसेच भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ग्रंथालयाचा वार्षिक अहवाल व ऑडिट मेमो वार्षिक तपासणी ऑनलाईन केली त्यामुळे सर्वच कामकाजात पारदर्शकता व सुलबता आली आहे.

जाहिरात

त्यामुळे राज्यातील सर्व ग्रंथालय पदाधिकारी चालकांना या नवनवीन तंत्रज्ञाना विषयी माहिती व्हावी तसेच उर्वरित मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी हे राज्यस्तरीय शिबिर आयोजित केले असून या शिबिरात अनेक मंत्री महोदय, खासदार, आमदार, पदाधिकारी, अधिकारी तसेच ग्रंथालय विभागातील तज्ञ मंडळी उपस्थित राहत मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी येथे २६ व २७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या भव्य राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहावे असे आवाहन राज्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे