आपला जिल्हा

आत्मा मालिक गुरुकुलात आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा

आत्मा मालिक गुरुकुलात आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा

आत्मा मालिक गुरुकुलात आत्मानंद वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा

जाहिरात आत्मा

येवला विजय कापसे दि १ फेब्रुवारी २०२५विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला चे अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस श्री.हनुमंतराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

जाहिरात

याप्रसंगी सावरगाव येथील आदर्श शिक्षक बी एन सोनवणे,हनुमंत भोंगळे, संत सेवादास महाराज, संत चरणदास महाराज, प्राचार्य तुषार कापसे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले.सद्गुरु आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्पोर्ट फ्लॅग होस्टिंग आणि ओथ घेऊन मशालीतील ज्योत पेटवण्यात आली.

जाहिरात

इयत्ता पाचवी तील अपूर्वा पल्ले, दृष्टी पाटोळे ,अक्षरा कोकणे, अन्वी जेजुरकर, आर्या जगदाळे ,जानवी मौर्य, आरोही कायस्थ, श्रुती आघाव, कोमल शिंदे, ईश्वरी आसने या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे स्वागत गीत सादर केले. अतिथी भाषणामध्ये सोनवणे सर यांनी खेळाचे महत्व सांगितले. त्यात त्यांनी सांगितले की ,विद्यार्थी हा बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे.विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास म्हणजेच त्यात शारीरिक विकास हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शारीरिक विकास हा व्यायामाने,खेळाने होतो. खेळाचे महत्व हे आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. खेळ कोणताही असो तो खेळाडू वृत्तीनेच खेळला पाहिजे.

जाहिरात

हनुमंतराव भोंगळे यांनी सांगितले व्यायामामुळे म्हातारपणी काठीचा आधार घेण्याची वेळ येणार नाही. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या. इ.पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सर्व खेळांमध्ये सहभाग घेतलेला होता. त्यात , सॅकरेस, पोटॅटो रेस,रनिंग रेस, कबड्डी, लंगडी,गोळा फेक, थाळी फेक इ. खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ खेळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली घोडके आणि मनीषा शिंदे यांनी केले. प्राचार्य तुषार कापसे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक यांनी खूप सहकार्य केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे