शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात
शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात
शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात

कोपरगाव विजय कापसे दि २ फेब्रुवारी २०२५–कोपरगाव शहरातील समता नगर जवळील शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री नर्मदा माता , श्री गणेश , श्री पार्वती माता व श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

प.पू. गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज व प.पू. महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभाशीर्वादाने व प.पू. महंत गुलाबगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

आज शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कलश मूर्ती शोभा यात्रा काढण्यात आली. प्रथमतः सप्तसरोवर या ठिकाणी विविध नद्यांच्या पाण्याने सर्व मूर्तीचा ट्रस्टीच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. या कलशाची सप्तसरोवर ते मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. महिलांनी नाचून, फुगडी खेळत हा आनंदोत्सव साजरा केला. अहिरणी गाण्यावर केलेले नृत्य हे खास आकर्षण ठरले. तीन तास चाललेल्या या मिरावणुकीनंतर कलश पूजन करून कलशा मधील पाण्याने मूर्त्याचा अभिषेक करण्यात आला व मुर्त्या धान्यामध्ये ठेवण्यात आल्या.

तसेच आज श्री गणेश पुण्याहवाचन , मातृका पूजन, मंडप पूजन, कुंड पूजन, वस्तू पूजन , जलयात्रा पूजन, जलाधीवास, योगिनी पूजन, वर्धिनी मंडल, सर्वोतोभद्र, गणेश भद्र, क्षेत्रापाल वस्तू, नवग्रह रुद्र स्थापना, नवग्रह होम , आरती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले असून उद्या रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी कुटीर होम , 108 शत रुद्रिय स्नान, धान्य धिवास, आरती करून सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी उत्तरांग हवन , मूर्ती प्राणप्रतिष्ठा, ध्वज पूजन करण्यात येणार आहे तर मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. नर्मदा माता रुद्र पूजन , रुद्र अभिषेक व साडे दहा वाजता ह. भ.प. रमेश महाराज गांगुर्डे चांदवड यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.





