आपला जिल्हा

राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूं मोठ्या उत्साहाने सहभागी

राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूं मोठ्या उत्साहाने सहभागी

राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूं मोठ्या उत्साहाने सहभागी

जाहिरात

अहिल्‍यानगर विजय कापसे दि १ ऑगस्ट २०२५स्पेशल ऑलिंपिक भारत या संघटनेच्‍या महाराष्ट्र शाखेच्‍या वतीने पुणे येथील बालकल्‍याण संस्‍थेत आयोजित करण्‍यात आलेल्‍या राज्यस्तरीय जलतरण व पॉवर लिफ्टिंग निवड चाचणी स्पर्धेत राज्यभरातील दिव्यांग खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून, अहिल्यानगर येथील शाखेच्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत २ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

जाहिरात

स्विमिंग स्पर्धेत बाबू याने ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्‍पर्धेत प्रथम क्रमांक आणि १०० स्‍पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला व दीपक कांतीलाल पावरा याने ५० मीटर फ्री स्टाईल जलतरण स्‍पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय पातळीवरील स्थान निश्चित केले आहे. पॉवर लिफ्टिंगमध्ये, चि. रज्जाक गोच्चू याने स्कॉट ४० किलोग्रॅम वजन गटात बेंच प्रेस – ४० किलोग्रॅम, डेड लिफ्ट – ९५ किलोग्रॅम वजन उचलून उत्कृष्ट कामगिरी केली. चि.कृष्णा यांने – स्कॉट – ४० किलोग्रॅम, बेंच प्रेस – ३५ किलोग्रॅम, डेड लिफ्ट – ८० किलोग्रॅम. चि.अभिजित माने याने स्कॉट – २० किलोग्रॅम, बेंच प्रेस – २० किलोग्रॅम, डेड लिफ्ट – ३५ किलोग्रॅम वजन उचलून यशस्वी सहभाग नोंदवला.

जाहिरात

सर्व खेळाडूंना प्रशिक्षण क्रीडा संचालक डॉ.किरण आहेर व विखे पाटील स्पोर्ट अकॅडमीचे प्रभारी विक्रांत येवले यांच्या मार्गदर्शनात विळदघाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्‍या स्पोर्ट अकॅडमी, येथे प्रा.संदिप राहाणे, दत्तात्रय कोलते व हर्षल वाणी या तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांनी दिले. हे सर्व खेळाडू जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळेंमध्ये शिक्षण घेत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना जागतिक व देश पातळीवर आपले नावलौकिक मिळावे म्हणून रणरागीणी महिला मंडळाच्‍या अध्‍यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्पेशल ऑलिंपिक भारताच्‍या अहिल्यानगर शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन तर्फे या सर्व दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येत असून, विखे पाटील भौतिक उपचार महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून खेळाडूंच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी विविध व्यायामांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या सर्व खेळाडूंना जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्‍या अध्‍यक्षा सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्‍यासह प्रा.डॉ.अभिजीत दिवटे, प्रशांत गायकवाड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, डॉ.दिपक अनाप, सरचिटणीस, डॉ.अभिजित मेरेकर, सचिन तरोटे यांनी या यशस्‍वी विद्यार्थ्‍यांना शुभेच्छा दिल्‍या आहेत.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे