संगमनेर

अमृतवाहिनी बँकेच्या वतीने बिजनेस समिट २०२५ कार्यक्रम उत्साहात

अमृतवाहिनी बँकेच्या वतीने बिजनेस समिट २०२५ कार्यक्रम उत्साहात
अमृतवाहिनी बँकेच्या वतीने बिजनेस समिट २०२५ कार्यक्रम उत्साहात
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ४ एप्रिल २०२५-

 लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ ची सांगता बिजनेस समिट २०२५ या कार्यक्रमाद्वारे   झाली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आर्थिक वर्ष २०२५ च्या बँकेचा कामकाजाचा आढावा हा सर्वांसमोर सादर करण्यात आला. याप्रसंगी मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, राम हरी कातोरे, अजय फटांगरे विष्णुपंत रहाटळ, ग्राहक वर्ग, अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे आणि संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

  याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले कि, अमृतवाहिनी बँकेने या आर्थिक वर्षांमध्ये ९८१ कोटीचा व्यवसाय टप्पा ओलांडलेला असून ढोबळ नफा ७ कोटी ८९ लाख रुपये झाला आहे. तर तरतुदी आणि कर पश्चात निव्वळ नफा  ३  कोटी दोन लाख रुपये झाला आहे. यावर्षी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे बँकेने नेट एनपीएचे प्रमाण ०% राखण्यामध्ये यश मिळवलेले आहे. या वर्षभरामध्ये बँकेच्या ठेवींमध्ये भरीव वाढ झाली असून बँकेच्या ठेवी ५७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून कर्ज वाटप देखील ४०५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेले आहे. बँकेने नुकताच सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये बँक व्यवसायामध्ये अधिक प्रगती साधणार आहे. बँकेचे कामकाज हे रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार चालते व याचे काटेकोर पालन बँकांनी केले पाहिजे असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालकांचे कौतुक करताना लोकनेते थोरात यांनी बँकेच्या कार्यामध्येजी पारदर्शकता राखली आहे त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक जे कार्य करत आहे त्याबद्दल बँकेचे विशेष अभिनंदन केले.

जाहिरात

याप्रसंगी राजेश मालपाणी म्हणाले कि, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बँकेने कायम शेतकरी, कर्जदार, ठेवीदार आणि सभासद यांचे हित जोपासले आहे. बँकेने आज जो व्यवसायिक टप्पा गाठला आहे त्याबद्दल बँकेचे अभिनंदन आहे. त्याचप्रमाणे बँकेने निव्वळ एनपीएचे प्रमाण ०% राखण्यामध्ये जे यश मिळवले आहे त्याबद्दल विशेष कौतुक आहे.

जाहिरात आत्मा

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी बँकेने छोट्या छोट्या व्यवसायिकांसाठी तसेच बचत गटांसाठी विविध योजना आणून या वर्गाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रम प्रसंगी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी बँकेच्या सर्व ठेवीदार, ग्राहकांचे मनापासून आभार व्यक्त केले असून थकीत कर्जदारांनी देखील बँकेस अनमोल सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले आहेत. त्याचबरोबर बँकेच्या सर्व कारभार सार्यांनी बँकेच्या व्यवसायामध्ये भरीव योगदान केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
याच कार्यक्रमांमध्ये सेवानिवृत्त होत असलेले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांचा सपत्नीक सत्कार थोरात साहेबांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी यांचे बँक परिवारामध्ये स्वागत करण्यात आले. या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे  स्वागत ॲड नानासाहेब शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजीराव जगताप यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे