प्रा.डॉ. साळवे यांना पीएच.डी मिळाल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा
प्रा.डॉ. साळवे यांना पीएच.डी मिळाल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा
प्रा.डॉ. साळवे यांना पीएच.डी मिळाल्याबद्दल विवेक कोल्हे यांनी दिल्या शुभेच्छा

कोपरगाव विजय कापसे दि ४ एप्रिल २०२५– रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयातील प्रा.डॉ. नितीन बाळासाहेब साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी नुकतीच पीएच.डी पदवी प्रदान केली असून त्यानिमित्त कोपरगाव येथील एस. एस. जी. एम.महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह.साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

प्रा.नितीन साळवे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये “अ स्टडी ऑफ इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी बिझिनेस इन नॉर्थ महाराष्ट्र” हे शिर्षक घेऊन शोध प्रबंध सादर केला. त्यांनी त्यांच्या संशोधनाची सुरुवात २०१८ साली केली.

या शोध प्रबंधाचा फायदा हा महाराष्ट्रातील पर्यटन प्रवाह वाढीसाठी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि एकत्रीकरणासाठी, पायाभूत सुविधांची सुधारिकरण होण्यासाठी, रोजगार निर्मिती होण्यासाठी तसेच नवीन संशोधकांना स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ कशी होते व स्थानिक व्यवसायांसमोरील आव्हाने ओळखून पुढील संशोधन करणे सोपे होईल. अशा विविध अंगांनी हा शोध प्रबंध समाजाला फायदेशीर ठरणार आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 



