आपला जिल्हा

शिंगणापूर गावातील फार्मर आय डी कार्ड शिबिराचा तहसीलदार सावंत यांनी घेतला आढावा

शिंगणापूर गावातील फार्मर आय डी कार्ड शिबिराचा तहसीलदार सावंत यांनी घेतला आढावा

शिंगणापूर गावातील फार्मर आय डी कार्ड शिबिराचा तहसीलदार सावंत यांनी घेतला आढावा

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि ७ फेब्रुवारी २०२५शासनाची शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेत महत्वाचे असणारे फार्मर आय डी कार्ड काढण्याची मोहीम सुरू असून या कामकाजाचा कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत हे स्वतः आढावा घेत असून त्यांनी गुरुवार दि ६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यलयात भेट देऊन आढावा घेत संबंधित सर्वाना कामकाज संबधी सूचना दिल्या या प्रसंगी त्यांचा समवेत तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे देखील होते.

जाहिरात

या प्रसंगी तहसीलदार सावंत यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरून आपल्याला एक फार्मर आयडी, मिळेल. ज्याद्वारे भविष्यात आपल्याला पीक विमा, पीककर्ज, पी.एम. किसान, विविध पिक अनुदान आदी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा फार्मर आय.डी. जवळच्या सेतू कार्यालयात अथवा सी. एस. सी सेंटर मध्ये पूर्णपणे मोफत काढून मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढून घ्यावा असे आवाहन तहसीलदार सावंत यांनी केले तर शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध यशस्वी कॅम्प आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

या प्रसंगी शिंगणापूरचे सरपंच डॉ. विजय काळे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे,कामगार तलाठी लहानू आप्पा, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय संवत्सरकर, पोलिस पाटील आढाव,शाम संवत्सरकर, भाऊसाहेब वाघ, शेखर कुऱ्हे, समाधान कुऱ्हे आदी ग्रामस्थ शेतकऱ्यांसह स्थानिक सेतू चालक उपस्थित होते.

जाहिरात

तर शिंगणापूर ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या फार्मर कार्ड काढण्यासाठी यशस्वीपणे कॅम्प आयोजित केल्याबद्दल माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कौतुक केले आहे तर कॅम्प यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, अरविंद सवत्सरकर, संजय तुळसकर, प्रसाद आढाव आदी सदस्यांसह जेष्ठ नेते यादवराव सवत्सरकर, राजाभाऊ लोणारी, कैलास सवंत्सरकर, बाळासाहेब संवत्सरकर, भीमराव संवत्सरकर, रंगनाथ संवत्सरकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे