संगमनेर
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मालदाड ते चिंचोली रस्ता पूर्णत्वाकडे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मालदाड ते चिंचोली रस्ता पूर्णत्वाकडे

संगमनेर विजय कापसे दि ८ फेब्रुवारी २०२५– लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन गावोगावच्या विविध रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासह प्रत्येक गावात विविध विकासाच्या योजना पूर्ण केले आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला तालुक्यातील उत्तर भागासाठी महत्त्वाचा असणारा मालदाड ते सोनोशी चिंचोली गुरव हा १९ किलोमीटरचा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून आता पूर्णत्वाकडे जात आहे.




