आपला जिल्हा

जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचा गुरुवारी कोपरगावात भव्य मिरवणूक व पूजन सोहळा

जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचा गुरुवारी कोपरगावात भव्य मिरवणूक व पूजन सोहळा

जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचा गुरुवारी कोपरगावात भव्य मिरवणूक व पूजन सोहळा
जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १६ फेब्रुवारी २०२५जगद्गुरु श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्य १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना नुकतेच प्रयागराजयेथील महाकुंभ मेळ्यात ‘जगद्गुरु’ या सर्वोच्च उपाधीने गौरवण्यात आल्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गुरुवारी कोपरगावात महाराजांची भव्य मिरवणूक व पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव तालुका जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना श्री क्षेत्र प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या सोहळ्यात श्री शंभू पंच दशनाम जुना आखाडा यांच्यावतीने पीठाधीश्वर आचार्य श्री स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘जगद्गुरु’ या सर्वोच्च उपाधीने गौरवण्यात आले असून शांतिगिरीजी महाराज हर राज्यातील एकमेव ‘जगद्गुरु’ या उपाधीने गौरवण्यात आलेले संत असल्याने नक्कीच संपूर्ण राज्यासह जय बाबाजी भक्त परिवारांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात
या शुभपर्व काळाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांची गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर ११ ते १२ या वेळेत पूजन सोहळा व त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी या भव्यदिव्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी व जगद्गुरु शांतिगिरीजी महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी गुरुवारी महात्मा गांधी प्रदर्शन साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जय बाबाजी भक्त परिवार कोपरगाव तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे