आत्मा मालिक हॉस्पिटल

आत्मा मालिक गुरुकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

आत्मा मालिक गुरुकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

आत्मा मालिक गुरुकुलात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जाहिरात आत्मा

येवला विजय कापसे दि १६ फेब्रुवारी २०२५विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल येवला येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हनुमंत भोंगळे, संत चरणदास महाराज ,प्राचार्य तुषार कापसे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले व सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

जाहिरात

आर्यन बोरसे,आयुष माळवे,आयुष हेडगिरे,हिमांशू दाणेज,पार्थ महाजन, प्रणव थळकर,साई काळंगे समर्थ पल्ले,सार्थक शिंदे,भक्ती जगताप, मनूश्री वडनेरे, शार्वि लग्गड, श्रावणी वरोडे, स्नेहल थळकर,वेदिका लचके, वेदिका आहेर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तुषार कापसे व दहावीच्या वर्गशिक्षिका सोनाली घोडके यांनीदेखील मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

नववीतील विद्यार्थी अश्विन कुमकर, स्पंदन लहरे यांनी सूत्रसंचालन केले. नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेटवस्तू देऊन कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पाडला. हनुमंत भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन परीक्षा संबंधी माहिती दिली.त्यात ते म्हणाले दहावी हा एक महत्त्वाचा टप्पा असून कोणत्याही प्रकारचा ताण तणाव विद्यार्थ्यांनी ठेवू नये.सद्गुरूंच्या ध्यानाने परीक्षेची सुरुवात करावी.मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण न ठेवता अभ्यास करा. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे